HomeArchiveगणेशोत्सव काळात शालेय...

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

Details
गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content