HomeArchiveगजानन कीर्तिकरांच्या रूपाने...

गजानन कीर्तिकरांच्या रूपाने पुन्हा युतीचा भगवा फडकणार!

Details
गजानन कीर्तिकरांच्या रूपाने पुन्हा युतीचा भगवा फडकणार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांचा मेळावा संपन्‍न
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं(ए)-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांना पुन्‍हा लोकसभेवर भरघोस मतांनी विजयी करण्‍याचा निर्धार अंधेरीच्‍या पंपहाऊस, शेर-ए-पंजाब कॉलनी येथे संपन्‍न झालेल्‍या महायुतीच्‍या गटप्रमुख-बुथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्‍यात करण्‍यात आला.

शिवसेना-भाजपा यांची गेल्‍या २५ वर्षांची युती आहे. मधल्‍या काही काळात मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नव्‍हते. आप-आपसातील कटुता विसरून शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना निवडून आणण्‍याचे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी गेल्‍या पाच वर्षांत खासदार म्‍हणून केलेल्‍या कामांची थोडक्‍यात माहिती दिली तर मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना-भाजपा युतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकदिलाने काम करून कीर्तिकर यांना पुन्‍हा निवडून देण्‍याचे आवाहन उपस्थितांना केले.

या महायुतीच्‍या भव्‍य महामेळाव्‍यात राज्‍याचे राज्‍यमंत्री रविंद्र वायकर, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर, शिवसेना आमदार व विभागप्रमुख अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, आमदार अमित साटम आणि आमदार भारती लव्‍हेकरसह रिपाइं(ए)-गटाचे नेते प्रकाश जाधव उपस्थित होते. शिवसेना-भाजपा पुरूष-महिला संघटक, नगरसेवक आदी मुख्‍य पदाधिकाऱ्यांसह गटप्रमुख-बुथप्रमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.

दरम्‍यान, शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांच्‍या मुख्‍य निवडणूक कार्यालयाचे अंबिका टॉवर, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व) येथे महायुतीचे नेते, आमदार, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्‍या उपस्थितीत उद्घाटन झाले.”
 
“मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांचा मेळावा संपन्‍न

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content