HomeArchive'क्रांती चिरायु होवो'चे...

‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

Details
‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content