HomeArchiveक्रांतिकारक जाहीरनामा!

क्रांतिकारक जाहीरनामा!

Details
क्रांतिकारक जाहीरनामा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
काँग्रेसचे तरुण अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आपल्या पक्षाचा महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या मातोश्री सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या साक्षीने राहुल यांनी काँग्रेसचे ब्रह्मास्त्र देशापुढे ठेवले. गेल्या काही वर्षांत राहुल गांधी गरिबांचा आवाज बनून पुढे आले आहेत. ते गरिबांविषयी बोलतात, दलितांविषयी आपल्या भावना व्यक्त करतात, शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा दर्शवितात, तरूणांना मार्गदर्शन करतात. सारांश, राहुल गांधी सर्व थरात आणि वयोगटात वावरताना दिसतात. साहजिकच, त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेला जाहीरनामा त्यांच्या स्वप्नातील उद्याचा भारत दाखवितो.

काँग्रेसचा जाहीरनामा हा सर्वसामान्य जनतेला आपलासा वाटावा म्हणून त्याला `जनआवाज’ असे म्हटले आहे. काँग्रेसच्या पथकाने सर्वसामान्य जनतेचा आवाज व दु:ख ऐकताना जे संशोधन केले त्यातूनच हा क्रांतिकारक जाहीरनामा निर्माण झाला आहे. इंदिराजींनी `गरिबी हटाव’ ही घोषणा दिली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी `अच्छे दिन आयेंगे’ अशी घोषणा दिली. शिवाय प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रूपये जमा होतील, असे आश्वासन दिले. हे आश्वासन हवेतच विरले. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी `तो निवडणुकीतील जुमला होता,’ असे म्हणत 15 लाखांच्या आश्वासनावर पडदा टाकला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देशातील 20 टक्के गरिबातील गरीब लोकांना वर्षाला 72,000 रूपये देण्याची न्याय्य योजना जाहीर केली. तेव्हापासून भाजपवाल्यांची अक्षरश: झोप उडाली आहे. आता निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करून काँग्रेसने भाजपवर ब्रह्मास्त्र सोडले आहे.

हिंदीत `हम निभाएंगे’ तर इंग्रजीत `Congress Will Deliver` असे या वचननाम्याचे शीर्षक आहे. हिंदीत `वादा निभाना’ म्हणजे मराठीत `वचन पाळणे’ होय. भाजपने आपले वचन पाळले नाही. म्हणूनच काँग्रेसने आपल्या वचननाम्याचे शीर्षक `हम निभाएंगे’ असे दिले आहे. आपल्या `हात’ या निशाणीचा संदर्भ देत काँग्रेसने पाच मोठ्या आश्वासनांचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. `गरिबी पर वार, हर साल 72 हजार’ हा गरिबांची मने जिंकणारा नारा देऊन काँग्रेसने प्रत्येकवर्षी गरिबांच्या खात्यात रू. 72,000/- जमा करण्याचे दिलेले आश्वासन नेत्रदीपक आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पाच वर्षांत 3 लाख 60 हजार इतका खर्च येणार आहे. गरिबांना दिलासा देणारी ही योजना आहे. यापूर्वी मोदी सरकारने गरीब शेतकऱ्यांना वर्षाला केवळ 6 हजार रूपये देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्याला महिना 500 रू. देणे म्हणजे चेष्टा होती. काँग्रेसने ही रक्कम 72 हजार अशी घसघशीत वाढवून भाजपच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. गेल्या 45 वर्षांत कधी नव्हती इतकी बेकारी वाढली आहे. देशात आता 5 कोटींहून अधिक तरूण बेकार आहेत. या तरूणांना दिलासा देण्यासाठी मार्च 2020 पर्यंत 22 लाख तरूणांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन राहुलजींच्या पक्षाने दिले आहे. त्याचबरोबर स्वयंरोजगार करणाऱ्यांना करसवलत देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. नव्या उद्योगांसाठी पहिल्या 3 वर्षांत कोणत्याही परवान्याची गरज लागणार नाही, अशी अभिनव योजना या जाहीरनाम्यात आहे. शेतकऱ्यांसाठी तर स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास तो फौजदारीऐवजी दिवाणी स्वरूपाचा गुन्हा समजण्यात येईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन काँग्रेसने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.

चोर उद्योगपती अब्जावधी रूपये लुटून पळून जातात. शेतकरी हा प्रामाणिक व गरीब असतो. त्याने कर्जाची परतफेड केली नाही तर त्याला गुन्हेगार समजून तुरूंगात पाठविले जाते. पण हे कर्ज दिवाणी गुन्हा ठरल्यास शेतकऱ्याला तुरूंगात जावे लागणार नाही. जाहीरनाम्यातील हा सर्वात मोठा मुद्दा आहे. सारांश, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीतील हा पहिला जाहीरनामा गरिबाभिमुख असाच झाला आहे. तो जनतेवर भुरळ घालण्यास किती यशस्वी ठरतो, हे आता पाहयचे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content