HomeArchiveकोरोनाला धडा शिकविण्यासाठी...

कोरोनाला धडा शिकविण्यासाठी शाळा सज्ज!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“कोविड 19 या संसर्गजन्य जागतिक महामारीमुळे वर्षभरापासून अनेक क्षेत्र बाधित झाले आहेत. त्यात अर्थव्यवस्थेसह सर्वात मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. अनेक शाळा, महाविद्यालये ऑनलाईन शिक्षणावर भर देत असले तरी व्यक्तिमत्व विकास साधायचा झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सरळ संवाद होणे गरजेचे आहे अशी भावना आता विद्यार्थी आणि पालकांची होऊ लागली आहे. या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी व एकप्रकारे कोरोनाला धडा शिकविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी येत्या काळात शाळा सज्ज होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध व आधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्याकडे अनेक शाळांना कल असल्याचे दिसून येत आहे.”
 
“डोंबिवली येथील रुणवाल गार्डन येथे नुकताच सुरू करण्यात युरो स्कूल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यांनीसुद्धा या बाबींकडे लक्ष वेधत दुजोरा दिला. त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षित शिक्षण घेऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही देशपांडे यानी सांगितले.”
  

 
“डोंबिवलीच्या रुणवाल गार्डनमध्ये जागतिक दर्जाचे शालेय शिक्षण मिळविण्यासाठी युरो स्कूल 6 शहरांमधील 11 कॅम्पसमधील त्यांच्या विद्यार्थ्यांकरिता आमची समर्पित शाळा पुनश्च हरिओम शासनाची संकल्पना तसेच सर्वत्र साथीची रोग येणारी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या जातील यासाठी प्रयत्न करीत आहेत. देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही एक बीव्हीक्यूआय प्रमाणित सुरक्षित शाळा आहोत आणि त्याव्यतिरिक्त, कोवसेफ – एक ब्यूरो व्हेरिटास- कोव्ह सेफ हायजीन मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन पोस्ट रिझोम्प्शन लागू करणार आहोत, जे सीओव्हीआयडीनंतरच्या परिस्थितीतील सर्व स्वच्छतेच्या जोखमीवर लक्ष जास्तीतजास्त शैक्षणिक आणि विना-शैक्षणिक प्रदर्शनासाठी ‘बॅलेन्स्ड स्कूलिंग’ या तत्त्वांवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये भारताचे पहिले प्रमाणित सेफ स्कूल नेटवर्क असल्याची प्रतिष्ठा आहे.”
 
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात कदाचित शाळा सुरू होण्याच्या अगोदरच्या शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार संपूर्ण सावधगिरीच्या उपायांसह करेल. सुरक्षितता आणि सुरक्षेच्या संदर्भात जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे पालन करण्यासाठी व्यवस्थापनाने सुरक्षित शाळा पुनरारंभ यासाठी नवनवीन धोरणे आखली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना सुरक्षेसह शिक्षणप्रणाली अंमलात येत असल्याचे दिसून येत आहे.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content