HomeArchiveकायद्याचं बोला!

कायद्याचं बोला!

Details
कायद्याचं बोला!

    02-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
अ‍ॅड. डॉ. निलेश वैजयंती भगवान पावसकर
Communication-mirrorgoregaon@gmail.com
 
मित्रांनो आपण पाहतो की, आपल्या आजूबाजूला नेहमीच लोकांची अशी तक्रार असते की, मी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलो किंवा गेले, पण माझ्या तक्रारीवर आजपर्यंत काहीही कारवाई झाली नाही. हे असे आपण बरेचदा वाचत आलो, पाहत आलो, बघत आलो. मात्र, यावर कधी आपण विचार केला का की, आपल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही? नेहमी आपल्याला असं वाटतं की, आपल्या तक्रारीवर कारवाई अशासाठी होत नाही कारण, पोलीस ठाण्यात बऱ्याचदा कायद्यापेक्षा `अर्थशास्त्र’ जास्त प्रभावी ठरतं. पण खरंच या विनोदात किती मर्यादेपर्यंत सत्य आहे? कारण बऱ्याचदा आपण अनुभव घेतलेला नसतो आणि ज्यांनी घेतलेला असतो त्यांना जर तुम्ही विचारलं की तुमचा नेमका अनुभव काय आहे तर ते कसा कसा सांगतील? आता पाहूया. ज्यांना अनुभव नसेल त्यांच्यासाठी हे उदाहरण डोळे उघडणारं असेल तर ज्यांना अनुभव आला असेल त्यांना आपण पुनःप्रत्ययाचा आनंद देऊ.
 
 
समजा, तुमचं शेजाऱ्याबरोबर कडाक्याचे भांडण झालं आणि तुम्ही तावातावाने भांडत राहिलात. जोपर्यंत आपल्या मुद्द्यांची सरशी होत असते तोपर्यंत माणूस भांडण चालू ठेवतो. मात्र, जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की, आता आपली सरशी होत नाही, आता आपल्याला कुठेतरी पराभवाच्या दिशेने जावे लागत आहे, तेव्हा मात्र आपल्याला कायदा आठवतो आणि आपण टेचात आपल्यासमोरच्या व्यक्तीला दम देतो की थांब, आता पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्याविरूद्ध तक्रार करतो आणि तुला शिकवतो कायदा काय आहे ते! आणि आपण त्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनला पोहोचतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नेमकं काय घडतं? खरं पाहता पहिल्या पाच मिनिटांत काहीच घडत नाही. कारण तुमच्याकडे कोणीच पाहत नाही की लक्ष देत नाही. पण थोडा जास्त वेळ तुम्ही रेंगाळताना दिसलात की तुमच्याकडे कोणीतरी करडया आवाजात विचारणा करेल.. तुमचे काय आहे? मग आपण सांगतो की, शेजाऱ्याविरूद्ध तक्रार नोंदवायची आहे. नंतर तेवढ्याच करडया आवाजात पुढचा प्रश्न येतो.. तुम्ही काय केलं?
अशावेळी घाबरायचं नसतं. कारण ती पोलिसांची एक पद्धत असते. खोटया तक्रारी बाहेर काढायची.. असो. तुम्ही घाबरत घाबरत मला एन.सी. नोंदवायची आहे, असा डायलॉग फेकून आपल्यालाही कायदा कळतो याची त्या पोलिसाला जाणिव करून देता. मग मात्र ते पोलीस अधिकारी निर्विकार पद्धतीने, ‘ठीक आहे यांची एन.सी. नोंदवून घ्या’, असे हाताखालच्या पोलिसाला सांगतात आणि त्यानंतर आपली एन.सी. नोंदवली जाते. जेव्हा आपली तक्रार नोंदवली जाते त्याच्याआधी आणि दरम्यान मिळून किमान दोन तासभर आपण वाया घालवतो आणि त्यानंतर घरी येतो. घरी आल्यानंतर आपण मोठ्या ऐटीने खिडकीतून वगैरे बघत असतो की आता पोलीस ठाण्यावरून पोलिसांची गाडी सायरन वाजवत येईल, आणि आपल्या शेजाऱ्याला गाडीत टाकून घेऊन जाईल. कारण आपण तसे सिनेमात पाहिलेले असते. मात्र, प्रत्यक्षात तसे त्यादिवशी काहीच घडत नाही. दुसऱ्या दिवशी हिरमुसले होऊन आपण आपल्या कामाला निघून जातो आणि त्यानंतर जेव्हा परत संध्याकाळी घरी येतो तेव्हा घरात शिरताच विचारतो की, बाजूच्या घरी पोलिसांची गाडी आली होती का, मात्र उत्तर नकारार्थीच मिळते आणि मग मात्र आपल्याला बेचैन व्हायला सुरूवात होते. आपल्या वाटतं की, आपण एवढे तास-दोन तास खर्च करून पोलीसठाण्यात तक्रार देऊन आलो तरीसुद्धा आपल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही, मग नंतर हळूहळू आपल्या मनात विचार येऊ लागतात, नक्कीच शेजाऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन काहीतरी ‘तोडपाणी’ केली असणार. कारण म्हणतात पोलीस ठाण्यात कायद्यापेक्षा `अर्थशास्त्र’ जास्त प्रभावी असते किंवा काहीतरी चिरीमिरी देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली असणार, हे पोलीस खातं असंच आहे इ.इ. अशाप्रकारे पोलीस खात्याला नाव ठेवत ती घटना आपण विसरून जातो.
 
 
मित्रांनो पोलिसांनी पैसे खाल्ले, पोलिसांनी कोणतीही कारवाई होऊ दिली नाही.. यापैकी नेमके काय खरे होते? खरं सांगू का, यातलं काहीही खरं नाही! ना तुमच्या शेजाऱ्याने पोलीस ठाण्यावर दबाव आणला, ना समोरच्या शेजाऱ्याने पोलीस ठाण्यात काही पैसे दिले, ना पोलिसांनी काही पैसे घेऊन कारवाई करण्याचे नाकारलं. या सगळ्या गोष्टी संपूर्णपणे चुकीच्या होत्या. तुमचे तर्क संपूर्णपणे चुकलेले होते. याच्यामागचं खरं कारण हे होतं की, तुम्हाला असलेलं कायद्याचं अज्ञान! तुम्हाला कायदा माहीत नाही आणि यामुळेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा वाटतात. मग सत्य काय आहे? यातलं महत्त्वाचं सत्य असं असतं की, तुम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर जेा काही एन.सी. नावाचा शब्द तक्रारीसाठी वापरला त्यामुळे बराचसा घोळ झालेला असतो. तुम्ही सांगितलं मला एन.सी. नोंदवायची आहे, पोलिसांनी एन.सी. नोंदवली. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला? नाही ना! मग आज आपण विचार करूया की नेमका काय आहे हा शब्द आणि त्या शब्दाचा उच्चार कुठे करायचा, कसा करायचा आणि मुख्य म्हणजे केव्हा करायचा नाही!
 
असे पहा. कायद्याने गुन्ह्याचे दोन भाग केलेले आहेत. गंभीर गुन्हे आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे! गंभीर गुन्हे म्हणजे खून, दरोडा, बलात्कार, चोरी इत्यादी इत्यादी. आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे म्हणजे एखाद्याला शिवीगाळ करणारे, एखाद्याची बदनामी करणं, त्याच्या अंगावर धावून जाणं, त्याला थोडक्यात धमकावणे इत्यादी इत्यादी. जे गंभीर गुन्हे आहेत त्याची शिक्षादेखील गंभीर असते आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत त्यांची शिक्षादेखील तुलनेने कमी गंभीर असते. उदाहरणार्थ खून, दरोडा इत्यादीला फाशी, जन्मठेप अशी शिक्षा दिलेली असते तर एखाद्याला शिवीगाळ करणं, अंगावर धावून जाणं, त्याची बदनामी करणं, यासारख्या कमी गंभीर गुन्ह्यांना दोन वर्षं, तीन वर्षं अशी शिक्षा दिलेली असते. त्याचप्रमाणेच गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची पद्धतही वेगळी आहे आणि तुलनेने कमी गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत वेगळी आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याचा पूर्ण अधिकार पोलिसांना कायद्याने दिलेला आहे आणि त्यासाठी त्यांना कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. अगदी कुठल्याही कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र जे तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्या तपासासाठी मात्र पोलिसांना कोर्टाच्या परवानगीची गरज लागते. म्हणून जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना इंग्रजीमध्ये कॉग्नायझेबल ऑफेंसेस किंवा मराठीतून दखलपात्र गुन्हे असा शब्द आहे तर जे तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत त्यांना नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्सेस किंवा अदखलपात्र गुन्हे असा शब्द वापरलेला आहे. आता दखलपात्र म्हणजे नेमकी कोणी दखल घ्यायची तर पोलिसांनी आणि अदखलपात्र म्हणजे कोणी दखल घ्यायची नाही तर पोलिसांनी दखल घ्यायची नाही. याचाच दुसऱ्या शब्दात अर्थ असा होतो की दखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे ज्याची दखल पोलिसांना कुणाच्याही परवानगीशिवाय घेता येते व त्याचा तपास करता येतो, तर अदखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे ज्याचा तपास पोलिसांनी कोर्टाच्या परवानगीशिवाय करायचा नसतो. आता एन.सी. हा (पोलीस स्टेशनला तुम्ही उच्चारलेला) शब्द नॉन कॉग्नायझेबल या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. मग आता कळलं का तुम्ही नेमकं काय केलं? पोलिसांना सांगितलं माझी एन.सी. घ्या आणि तपास करा. म्हणजे माझ्या अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार घ्या (ज्याचा तपास करण्याचा तुम्हाला अधिकार नाही) आणि मात्र आता त्याचा तपास करा. मग काय मंडळी होईल का तपास??
 
 
आता लक्षात आलं का पोलीसठाण्यात गेल्यानंतर कोणता शब्द अजिबात उच्चारायचा नाही तर तो म्हणजे “एन.सी.’’ कारण, मग तुमचा अदखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल, ज्याच्या तपासाचा पोलिसांना मुळातच अधिकार नाही. म्हणून पोलीसठाण्यात गेल्यानंतर कानाला खडा लावा की एन.सी. हा शब्द आपण उच्चारायचा नाही. मग प्रश्न असा येतो मग नेमकं सांगायचं काय? तर आपण असं सांगायचं की मला दखलपात्र गुन्हा नोंदवायचा आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं तर मला सी.आर. नोंदवायचा आहे. अर्थात अलीकडे तुम्ही सी.आर. नोंदवा किंवा तुम्ही एन.सी. नोंदवा त्याचा फॉरमॅट बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये एफ.आय.आर. असा शब्द जो पूर्वी फक्त दखलपात्र गुन्ह्यांच्या संदर्भात वापरला जायचा तो आता एन.सी.च्या संदर्भातसुद्धा कायदेशीररित्या वापरला जातो. आणि तुम्हाला हे कळतच नाही की आपली नोंदवलेली तक्रार ही दखलपात्र स्वरूपाची आहे की, अदखलपात्र स्वरूपाची आहे. म्हणून यासाठी आता तुम्हाला सांगतो ती महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुमची तक्रार एफ.आय.आर म्हणजेच गुन्ह्याची प्रथम खबर असं लिहिलेल्या एखाद्या फॉर्मवर लिहायला सुरूवात होते. तेव्हा नीटपणानं त्याच्या सर्वात वरच्या भागात काय छापलेले आहे ते पाहा. जर त्या फॉर्मवर कलम १५४ अंतर्गत असे लिहिलं असेल तर तुमची तक्रार दखलपात्र स्वरूपाची आहे आणि पोलीस तपास होईल. मात्र जर त्या ठिकाणी कलम १५५ अंतर्गत असं लिहिलं असेल तर मात्र तुमची तक्रार ही अदखलपात्र स्वरूपात नोंदवली गेलेली आहे. अर्थात एन.सी. म्हणून नोंदवली गेलेली आहे आणि त्याचा तपास पोलीस करू शकणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.. मग, काय तर मित्रांनो सगळया गोष्टी स्पष्ट झाल्या ना, मग आता कधी जर पोलीस ठाण्यात जायची वेळ आलीच तर या सगळ्या गोष्टी आठवा आणि नेमकं “कायद्याचं बोला”!”

 

 
 
 
अ‍ॅड. डॉ. निलेश वैजयंती भगवान पावसकर
Communication-mirrorgoregaon@gmail.com

 
“मित्रांनो आपण पाहतो की, आपल्या आजूबाजूला नेहमीच लोकांची अशी तक्रार असते की, मी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलो किंवा गेले, पण माझ्या तक्रारीवर आजपर्यंत काहीही कारवाई झाली नाही. हे असे आपण बरेचदा वाचत आलो, पाहत आलो, बघत आलो. मात्र, यावर कधी आपण विचार केला का की, आपल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही? नेहमी आपल्याला असं वाटतं की, आपल्या तक्रारीवर कारवाई अशासाठी होत नाही कारण, पोलीस ठाण्यात बऱ्याचदा कायद्यापेक्षा `अर्थशास्त्र’ जास्त प्रभावी ठरतं. पण खरंच या विनोदात किती मर्यादेपर्यंत सत्य आहे? कारण बऱ्याचदा आपण अनुभव घेतलेला नसतो आणि ज्यांनी घेतलेला असतो त्यांना जर तुम्ही विचारलं की तुमचा नेमका अनुभव काय आहे तर ते कसा कसा सांगतील? आता पाहूया. ज्यांना अनुभव नसेल त्यांच्यासाठी हे उदाहरण डोळे उघडणारं असेल तर ज्यांना अनुभव आला असेल त्यांना आपण पुनःप्रत्ययाचा आनंद देऊ.”
 
 
“समजा, तुमचं शेजाऱ्याबरोबर कडाक्याचे भांडण झालं आणि तुम्ही तावातावाने भांडत राहिलात. जोपर्यंत आपल्या मुद्द्यांची सरशी होत असते तोपर्यंत माणूस भांडण चालू ठेवतो. मात्र, जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की, आता आपली सरशी होत नाही, आता आपल्याला कुठेतरी पराभवाच्या दिशेने जावे लागत आहे, तेव्हा मात्र आपल्याला कायदा आठवतो आणि आपण टेचात आपल्यासमोरच्या व्यक्तीला दम देतो की थांब, आता पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्याविरूद्ध तक्रार करतो आणि तुला शिकवतो कायदा काय आहे ते! आणि आपण त्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनला पोहोचतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नेमकं काय घडतं? खरं पाहता पहिल्या पाच मिनिटांत काहीच घडत नाही. कारण तुमच्याकडे कोणीच पाहत नाही की लक्ष देत नाही. पण थोडा जास्त वेळ तुम्ही रेंगाळताना दिसलात की तुमच्याकडे कोणीतरी करडया आवाजात विचारणा करेल.. तुमचे काय आहे? मग आपण सांगतो की, शेजाऱ्याविरूद्ध तक्रार नोंदवायची आहे. नंतर तेवढ्याच करडया आवाजात पुढचा प्रश्न येतो.. तुम्ही काय केलं?”
“अशावेळी घाबरायचं नसतं. कारण ती पोलिसांची एक पद्धत असते. खोटया तक्रारी बाहेर काढायची.. असो. तुम्ही घाबरत घाबरत मला एन.सी. नोंदवायची आहे, असा डायलॉग फेकून आपल्यालाही कायदा कळतो याची त्या पोलिसाला जाणिव करून देता. मग मात्र ते पोलीस अधिकारी निर्विकार पद्धतीने, ‘ठीक आहे यांची एन.सी. नोंदवून घ्या’, असे हाताखालच्या पोलिसाला सांगतात आणि त्यानंतर आपली एन.सी. नोंदवली जाते. जेव्हा आपली तक्रार नोंदवली जाते त्याच्याआधी आणि दरम्यान मिळून किमान दोन तासभर आपण वाया घालवतो आणि त्यानंतर घरी येतो. घरी आल्यानंतर आपण मोठ्या ऐटीने खिडकीतून वगैरे बघत असतो की आता पोलीस ठाण्यावरून पोलिसांची गाडी सायरन वाजवत येईल, आणि आपल्या शेजाऱ्याला गाडीत टाकून घेऊन जाईल. कारण आपण तसे सिनेमात पाहिलेले असते. मात्र, प्रत्यक्षात तसे त्यादिवशी काहीच घडत नाही. दुसऱ्या दिवशी हिरमुसले होऊन आपण आपल्या कामाला निघून जातो आणि त्यानंतर जेव्हा परत संध्याकाळी घरी येतो तेव्हा घरात शिरताच विचारतो की, बाजूच्या घरी पोलिसांची गाडी आली होती का, मात्र उत्तर नकारार्थीच मिळते आणि मग मात्र आपल्याला बेचैन व्हायला सुरूवात होते. आपल्या वाटतं की, आपण एवढे तास-दोन तास खर्च करून पोलीसठाण्यात तक्रार देऊन आलो तरीसुद्धा आपल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही, मग नंतर हळूहळू आपल्या मनात विचार येऊ लागतात, नक्कीच शेजाऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन काहीतरी ‘तोडपाणी’ केली असणार. कारण म्हणतात पोलीस ठाण्यात कायद्यापेक्षा `अर्थशास्त्र’ जास्त प्रभावी असते किंवा काहीतरी चिरीमिरी देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली असणार, हे पोलीस खातं असंच आहे इ.इ. अशाप्रकारे पोलीस खात्याला नाव ठेवत ती घटना आपण विसरून जातो.”
 
 
“मित्रांनो पोलिसांनी पैसे खाल्ले, पोलिसांनी कोणतीही कारवाई होऊ दिली नाही.. यापैकी नेमके काय खरे होते? खरं सांगू का, यातलं काहीही खरं नाही! ना तुमच्या शेजाऱ्याने पोलीस ठाण्यावर दबाव आणला, ना समोरच्या शेजाऱ्याने पोलीस ठाण्यात काही पैसे दिले, ना पोलिसांनी काही पैसे घेऊन कारवाई करण्याचे नाकारलं. या सगळ्या गोष्टी संपूर्णपणे चुकीच्या होत्या. तुमचे तर्क संपूर्णपणे चुकलेले होते. याच्यामागचं खरं कारण हे होतं की, तुम्हाला असलेलं कायद्याचं अज्ञान! तुम्हाला कायदा माहीत नाही आणि यामुळेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा वाटतात. मग सत्य काय आहे? यातलं महत्त्वाचं सत्य असं असतं की, तुम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर जेा काही एन.सी. नावाचा शब्द तक्रारीसाठी वापरला त्यामुळे बराचसा घोळ झालेला असतो. तुम्ही सांगितलं मला एन.सी. नोंदवायची आहे, पोलिसांनी एन.सी. नोंदवली. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला? नाही ना! मग आज आपण विचार करूया की नेमका काय आहे हा शब्द आणि त्या शब्दाचा उच्चार कुठे करायचा, कसा करायचा आणि मुख्य म्हणजे केव्हा करायचा नाही!”
 

“असे पहा. कायद्याने गुन्ह्याचे दोन भाग केलेले आहेत. गंभीर गुन्हे आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे! गंभीर गुन्हे म्हणजे खून, दरोडा, बलात्कार, चोरी इत्यादी इत्यादी. आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे म्हणजे एखाद्याला शिवीगाळ करणारे, एखाद्याची बदनामी करणं, त्याच्या अंगावर धावून जाणं, त्याला थोडक्यात धमकावणे इत्यादी इत्यादी. जे गंभीर गुन्हे आहेत त्याची शिक्षादेखील गंभीर असते आणि तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत त्यांची शिक्षादेखील तुलनेने कमी गंभीर असते. उदाहरणार्थ खून, दरोडा इत्यादीला फाशी, जन्मठेप अशी शिक्षा दिलेली असते तर एखाद्याला शिवीगाळ करणं, अंगावर धावून जाणं, त्याची बदनामी करणं, यासारख्या कमी गंभीर गुन्ह्यांना दोन वर्षं, तीन वर्षं अशी शिक्षा दिलेली असते. त्याचप्रमाणेच गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची पद्धतही वेगळी आहे आणि तुलनेने कमी गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत वेगळी आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याचा पूर्ण अधिकार पोलिसांना कायद्याने दिलेला आहे आणि त्यासाठी त्यांना कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. अगदी कुठल्याही कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र जे तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्या तपासासाठी मात्र पोलिसांना कोर्टाच्या परवानगीची गरज लागते. म्हणून जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना इंग्रजीमध्ये कॉग्नायझेबल ऑफेंसेस किंवा मराठीतून दखलपात्र गुन्हे असा शब्द आहे तर जे तुलनेने कमी गंभीर गुन्हे आहेत त्यांना नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्सेस किंवा अदखलपात्र गुन्हे असा शब्द वापरलेला आहे. आता दखलपात्र म्हणजे नेमकी कोणी दखल घ्यायची तर पोलिसांनी आणि अदखलपात्र म्हणजे कोणी दखल घ्यायची नाही तर पोलिसांनी दखल घ्यायची नाही. याचाच दुसऱ्या शब्दात अर्थ असा होतो की दखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे ज्याची दखल पोलिसांना कुणाच्याही परवानगीशिवाय घेता येते व त्याचा तपास करता येतो, तर अदखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे ज्याचा तपास पोलिसांनी कोर्टाच्या परवानगीशिवाय करायचा नसतो. आता एन.सी. हा (पोलीस स्टेशनला तुम्ही उच्चारलेला) शब्द नॉन कॉग्नायझेबल या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. मग आता कळलं का तुम्ही नेमकं काय केलं? पोलिसांना सांगितलं माझी एन.सी. घ्या आणि तपास करा. म्हणजे माझ्या अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार घ्या (ज्याचा तपास करण्याचा तुम्हाला अधिकार नाही) आणि मात्र आता त्याचा तपास करा. मग काय मंडळी होईल का तपास??”
 
 
“आता लक्षात आलं का पोलीसठाण्यात गेल्यानंतर कोणता शब्द अजिबात उच्चारायचा नाही तर तो म्हणजे “एन.सी.’’ कारण, मग तुमचा अदखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल, ज्याच्या तपासाचा पोलिसांना मुळातच अधिकार नाही. म्हणून पोलीसठाण्यात गेल्यानंतर कानाला खडा लावा की एन.सी. हा शब्द आपण उच्चारायचा नाही. मग प्रश्न असा येतो मग नेमकं सांगायचं काय? तर आपण असं सांगायचं की मला दखलपात्र गुन्हा नोंदवायचा आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं तर मला सी.आर. नोंदवायचा आहे. अर्थात अलीकडे तुम्ही सी.आर. नोंदवा किंवा तुम्ही एन.सी. नोंदवा त्याचा फॉरमॅट बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये एफ.आय.आर. असा शब्द जो पूर्वी फक्त दखलपात्र गुन्ह्यांच्या संदर्भात वापरला जायचा तो आता एन.सी.च्या संदर्भातसुद्धा कायदेशीररित्या वापरला जातो. आणि तुम्हाला हे कळतच नाही की आपली नोंदवलेली तक्रार ही दखलपात्र स्वरूपाची आहे की, अदखलपात्र स्वरूपाची आहे. म्हणून यासाठी आता तुम्हाला सांगतो ती महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुमची तक्रार एफ.आय.आर म्हणजेच गुन्ह्याची प्रथम खबर असं लिहिलेल्या एखाद्या फॉर्मवर लिहायला सुरूवात होते. तेव्हा नीटपणानं त्याच्या सर्वात वरच्या भागात काय छापलेले आहे ते पाहा. जर त्या फॉर्मवर कलम १५४ अंतर्गत असे लिहिलं असेल तर तुमची तक्रार दखलपात्र स्वरूपाची आहे आणि पोलीस तपास होईल. मात्र जर त्या ठिकाणी कलम १५५ अंतर्गत असं लिहिलं असेल तर मात्र तुमची तक्रार ही अदखलपात्र स्वरूपात नोंदवली गेलेली आहे. अर्थात एन.सी. म्हणून नोंदवली गेलेली आहे आणि त्याचा तपास पोलीस करू शकणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.. मग, काय तर मित्रांनो सगळया गोष्टी स्पष्ट झाल्या ना, मग आता कधी जर पोलीस ठाण्यात जायची वेळ आलीच तर या सगळ्या गोष्टी आठवा आणि नेमकं “कायद्याचं बोला”!”

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content