Homeमुंबई स्पेशलमुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास...

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे आज, रविवार, ३ मे २०२६ रोजी त्यांचा ६९वा वाढदिवस होता. मोकाशी यांच्या पार्थिवावर बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन बंधू आहेत.

गेल्या काही काळापासून ते गंभीर आजारपणाने त्रस्त होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी सरोज यांचे निधन झाले. तेव्हापासून ते बऱ्यापैकी खचले होते. अत्यंत मितभाषी पण आपल्या विधानावर ठाम राहणारे मोकाशी यांनी कायम शोधपत्रकारितेवर भर दिला. कोणत्याही स्तराची बातमी असली तरी ते देण्यात ते डगमगले नाहीत. धमक्या, प्रलोभने यापासून कधीही ते बधले नाहीत. सदा हसतमुख असलेला त्यांचा चेहरा बातमीच्या नजरेतून काय शोधतोय हे कधी कुणाला कळायचेच नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीचे एमडी परीक्षेतल्या गुणवाढीचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले. या प्रकरणामुळेच अखेर निलंगेकर पाटील यांना आपल्या मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले.

त्यांच्या एका बातमीमुळेच एका राज्यपालांनाही पद सोडावे लागले होते. १९९०च्या दशकात त्यांनी मुंबईतल्या डॉ. संतोष राऊत यांचे किडनी रॅकेट उघड केले होते. इंडियन एक्स्प्रेस, मिड डे, अशा काही प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारितेपासून लांब राहिले होते. मात्र, या काळात ते पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या विविध संस्थांच्या वर्गातून नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करत होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content