HomeArchiveकांदिवली वाहतूक विभाग...

कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

Details
कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवलीमधील अनधिकृत वाहने, बेकायदा पार्किंग आदी वाहतूक समस्येसंदर्भात बुधवारी कांदिवली पूर्व, समता नगर, एसीपी कार्यालय येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या समस्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी येत्या आठवड्यात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

कांदिवली पूर्व विभागातील वाहतूक समस्यांच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी नुकतीच डीसीपी, डीसीपी वाहतूक, परिवहन तसेच महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिस प्रशासनातर्फे येत्या आठवड्यात अवैध वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. आकुर्ली रोड वरील वाहतुकीला आळा बसावा यासाठी पोलीस बंदोबस्त, कांदिवली आणि मालाड पूर्व रेल्वेस्टेशन परिसरात सकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त, अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश भातखळकर यांनी या बैठकीमध्ये दिले.
 
या सगळ्या मागण्या पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासनाने मान्य केल्या आहेत. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी स्वामी यांनी दिले आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंग जागा, रॅश ड्रायव्हिंग, डबल पार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला कांदिवली डीसीपी डॉ. डी. स्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कसबे, आर दक्षिण विभाग मुंबई मनपाचे अधिकारी आकरे, कांदिवली वाहतूक विभागाचे डीसीपी संदीप भाजीभाकरे, डेप्युटी आरटीओ दहिसर विभाग अशोक पवार, नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेवक ठाकूर सागर-सिंह, ‘लोखंडवाला रेसिडेंट्स असो.’ आणि दक्ष नागरिक उपस्थित यावेळी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content