HomeArchiveकविता कशी जन्माला...

कविता कशी जन्माला येते?

Details
कविता कशी जन्माला येते?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

जानेवारीमध्ये यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील कवी-कवयित्रींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 11 ते 13 जानेवारी दरम्यान संमेलनात रंगणार्‍या काव्य कट्ट्यासाठी गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडत एक हजार 286 कविता पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात कवी कट्ट्यासाठी एकूण 23 तास मिळणार असल्याने यातील 460 कवींना कट्ट्यावर काव्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कविता कशी जन्माला येते हे आपण सोदाहरण पाहूया.

कविता ही अचानक सुचते. एखादी घटना कविता जन्माला घालते. प्रेमातून जसे काव्य निर्माण होते. तसेच प्रेमभंगातूनदेखील ते जन्माला येते. तथापि, कवितेसाठी गाठीशी त्या घटनेचा अनुभव असावाच लागतो असे नव्हे. उदा. हरिवंशराय बच्चन यांनी ‘मधुशाला’ हे मद्यपानावरील अजरामर दीर्घकाव्य लिहीले. पण हरिवंशरायजी स्वत: मद्यपान करीत नव्हते. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर एकदा सायन येथे बसमध्ये बसले. त्यांना व्ही.टी.ला जायचे होते. दादर टी.टी. येथे एक तरूणी बसमध्ये चढली. पाडगावकरांचे तिच्याकडे लक्ष गेले. ती तरूणी आपल्याच विश्वात रमली होती. कधी खिडकीबाहेर पाहून स्वत:शीच हसत होती तर कधी लाजत होती. पाडगावकर टक लावून तिचा तो बोलका चेहरा न्याहळत होते. ती तरूणी लालबागला उतरून निघून गेली. त्याक्षणी पाडगावकरांना ते अजरामर गीत सुचले: ‘‘ लाजून हासणे अन् हासून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..’’

पाडगावकरांनी हा किस्सा वृत्तपत्र छायाचित्रकार विजय तारी यांना सांगितला तेव्हा तारींनादेखील एक चारोळी सुचली. ते पाडगावकारांना म्हणाले, ‘‘पाडगावकर, तुम्ही कंडक्टरला तिकीटसाठी नाणे दिले. पण, त्या मुलीने तुम्हाला जाता जाता गाणे दिले.’’

सारांश, कविता कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही परिस्थितीत जन्माला येते. यासंदर्भात आमचा अनुभव असा: आम्ही कार्यालयात जाण्यासाठी घरचा जीना उतरत होतो तेव्हा एक मोटार एका कुत्र्याला चिरडून निघून गेली. तो दुर्दैवी मुका प्राणी काही क्षणात तडफडून मेला. आम्ही काहीच करू शकलो नाही. कार्यालयात जाताना त्याचे ते तडफडणे नजरेसमोर येत होते. तेव्हा आम्हाला एक चारोळी सुचली. ती आमच्या ‘पाकळ्या’ या चारोळी संग्रहात आहे. ती अशी:
अपघात झालेलं कुत्रं
मी मरताना पाहिलं
पाऊलं माझी पुढे गेली
मन त्याच्याजवळ राहिलं
भविष्यात मराठी कवितांचा इतिहास लिहायचा झाल्यास अशी कितीतरी उदाहरणे समोर येतील. लोकप्रिय कविता कशा जन्माला आल्या हे वाचणे वाचकांना निश्चितच आवडेल.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content