HomeArchiveएक पढतमूर्ख!

एक पढतमूर्ख!

Details
एक पढतमूर्ख!

    30-Mar-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवरून शिवसेना-भाजप युतीत वाद सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा या मतदारसंघातून उभे राहू इच्छितात. त्यांचा पक्षदेखील त्यांना उमेदवारी देण्यास तयार आहे. पण मित्रपक्ष शिवसेनेने सोमय्या यांना कडाडून विरोध केला आहे. गेल्या पाच वर्षांत सोमय्या यांनी शिवसेनेविरूद्ध जी मुक्ताफळे उधळली ती त्यांच्या अंगाशी आली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील सोमय्या यांनी सोडले नाही. संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपल्या मित्रपक्षावर हल्ले चढविले. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. आज हेच शिवसैनिक सोमय्या यांना विरोध करीत आहेत. सारांश, सोमय्या यांच्या मार्गातील हा अडसर म्हणजे त्यांच्याच कर्माचे फळ आहे.

सोमय्या गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. पण सीएची प्रॅक्टिस न करता त्यांनी पूर्णवेळ राजकारण हा पेशा स्वीकारला. त्यात ते चांगले यशस्वीदेखील झाले. पूर्वी सोमय्या हे पत्रकारांचे मित्र होते. त्यामुळे वर्तमानपत्रात त्यांना चांगली प्रसिद्धी मिळत असे. एखादी चांगली गोष्ट घडली की तिचे श्रेय घ्यायला सोमय्या पुढे असत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांचे नाव `क्रेडीट’ सोमय्या असे ठेवले होते. या संदर्भातील एक किस्सा मनोरंजक आहे. महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या मैदानावर भाजपचे महाअधिवेशन भरले होते. त्यावेळी कोणीतरी पत्रकारकक्षात किरीट सोमय्या यांना शोधत आले. तेव्हा एका वात्रट इसमाने गंभीर चेहरा करून त्याला सांगितले, `येथून बाहेर जा. कॅमेऱ्यांचा घोळका कोठे दिसतो ते पाहा. तेथेच तुम्हाला किरीट सोमय्या सापडतील.’ सारांश, श्रेय घेणे आणि प्रसिद्धी मिळविणे हा सोमय्या यांचा जुना छंद आहे. वयाची साठी ओलांडण्यानंतरही त्यांचा तो छंद कायम आहे. कदाचित या छंदापोटीच त्यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर वेळोवेळी टीका केली असावी. पण त्या टीकेचे मोल त्यांना आज मोजावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर आम्हाला दासवाणी आठवली. दासवाणीत काय म्हटले आहे पाहा:

।।दास-वाणी।।
वंदुनी सद् गुरूचरण।
करून रघुनाथ स्मरण।
त्यागार्थ मूर्खलक्षण।
बोलिजेल।।
येकमूर्ख येकपढतमूर्ख।
उभय लक्षणी कौतुक।
श्रोती सादर विवेक।
केला पाहिजे।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ०२/०१/०३-०४
गणेश शारदेला वंदन केले. आता श्री गुरूंच्या चरणांनाही वंदन करून, श्री रघुनाथांना स्मरून मूर्खांची लक्षणे सांगणार आहे. ती अंगी बाणण्यासाठी नसून त्यांचा त्याग करण्यासाठी सांगत आहे. एक मूर्ख असतो ज्याला आपल्याला काहीच समजत नाही हेही समजत नाही. स्वत:च्या चुका या चुका आहेत हेच त्याला मान्य नसते. त्यामुळे मूर्खपणाच्या नंदनवनात तो आनंदात असतो. दुसरा पढतमूर्ख आहे. सर्वज्ञ आहे. विद्वान आहे. शहाणा असूनही व्यवहारात मूर्खासारखा वागतो. पढतमूर्ख ही मूर्खाची पुढची दशा. यात अहंकारी वृत्ती असल्याने माणूस बरा व्हायला बरेच प्रयत्न आणि बराच काळ लागतो. दोघांमधील सूक्ष्म फरक श्रोत्यांनी नीट विवेकानेच समजून घेतला पाहिजे. दोन्हीही त्याज्यच निश्चित. मूर्खलक्षण समास.

किरीट सोमय्या हे उच्चशिक्षित आहेत. आर्थिक हिशेबातील विद्वान आहेत पण जीवनातील हिशेबाचे गणित त्यांना कळलेले दिसत नाही. आपल्या मित्रपक्षावर नको तशी टीका करून त्यांनी या पक्षाचा राग ओढवून घेतला. आता निवडणुकीच्या काळात शिवसेना त्यांच्याविरोधात गेली आहे. सोमय्या यांना पक्षाने तिकीट दिले तरी शिवसैनिक त्यांना पाडण्यासाठी कंबर कसणार, हे निश्चित आहे. दासवाणीत वर्णन केलेला एक पढतमूर्ख आपल्यासमोर आहे. त्याची कीव करावी तेवढी थोडी आहे.”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content