HomeArchiveईशान्य मुंबईत भाजपच्या...

ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

Details
ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content