HomeArchive"आठवले"ली धक्काबुक्की!

“आठवले”ली धक्काबुक्की!

Details
“””आठवले””ली धक्काबुक्की!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

[email protected]

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे एका तरूणाने धक्काबुक्की केली. या अचानक झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. आठवले यांना झेड सुरक्षा असूनही त्यांच्यावर त्यातरूणाने हल्ला कसा केला हे आश्चर्यच आहे. आठवले यांचेच सरकार असताना सुरक्षेचे असे धिंडवडे निघावे याचीच चर्चा राज्यभर होती. सर्व वृत्तपत्रात व चॅनेलवर या बातम्या झळकल्यानंतर काही पत्रकार त्यांना भेटण्यासाठी गेले.  पत्रकार संविधान बंगल्यावर पोहोचले. आठवलेसाहेबांच्या पीएने आत जाऊन निरोप दिला…  साहेबांचा निरोप घेऊन आल्यावर पत्रकार दालनात गेले.

आठवले डोक्याला मफलर गुंडाळून बसले होते. टेबलावर गरम पाण्याची पिशवी होती. आयोडेक्सची छोटी बाटली आडवी पडली होती.

पत्रकार: हा अचानक हल्ला? कोणावर संशय आहे का तुमचा?

आठवले: संशय घेऊन काय उपयोग? मला झेड सुरक्षा असताना हे कसे घडलेss…? (साहेब स्वतःचा हात दाबत बोलत होते… तेवढ्यात त्यांच्या बाजूला उभा असलेल्या कार्यकर्ता गरम पाण्याची पिशवी घेऊन पाठ व खाकेच्या खाली शेक देत होता.)

पत्रकार: चांगलाच मार लागला हो? असं घडायला नको होतं बघा…

आठवले: (हळू आवाजात… यांना चहा आणिखाss… असे उच्चार करत असताना त्यांच्या कंबरेत कळ आली)

पत्रकार: नको, नको आम्हाला नुसता चहा चालेल…

आठवले: चहा आणि कांदे पोहे आणा (असं जरा जोरात सांगितलं. कळ थांबल्याचे लक्षात येताच पत्रकारांना हायसे वाटले)

पत्रकार: तुम्ही मुख्यमंत्र्यांना हा प्रकार सांगितला का?

आठवले: त्यांचाच फोन आला होता…सांगितलं त्यांना हा सर्व प्रकार…

पत्रकार: तुमचंच सरकार आहे ना, काळजी त्यांना घ्यावी लागणारच हो..?

आठवले: कशाला आमच्यात लावालावी करता तुम्ही. राहिलेत तीन- चार महिने? सावरून घ्या की?

पत्रकार: मागे सेना-भाजपा युतीचं सरकार असताना रमाबाई प्रकरण चालू असताना तुम्हाला भीम सैनिकांनी पळवून लावले…

दुसरा पत्रकार: त्यावेळी तुम्ही गटारातून पळत असतानाही  भीमसैनिकांनी तुमचा पाठलाग सोडला नाही… (हे ऐकताच आठवलेंना काही घटना आठवल्या आणि त्यांची पाठ दुखू लागली… ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांच्या पाठीवर गरम पाण्याची पिशवी जोरात शेकवली… अरेरे कोणता सूड घेतोस, जरा हळूहळू… आठवलेंनी कंबर ऍडजस्ट करत सांगितले)

आठवले: कसे आठवले ते दिवस तुम्हाला? मी सर्व तेविसरलो… दिल्लीतील घरातील सामान रस्त्यावर फेकले तेव्हा तुम्ही काहीच लिहिले नाही…(आठवले डोळे वर करून बोलत होते. नेहमी प्रमाणे पण, पत्रकारांना त्यांची ती सवय माहित असल्याने कोणी ते गांभीर्याने घेतले नाही)

पत्रकार: बघा ते आम्ही तुम्हाला विचारणारच होतो,पण तुम्हीच आठवण करून दिली… त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते, आता तर तुमचेच सरकार असताना?

आठवले: (बाजूला उभा असलेल्या कार्यकर्त्याला… चहा नाश्ता लवकर आणायला सांग रेss…) काय म्हणत होता तुम्ही? (तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते, साहेबांचा फोन आहे…)

आठवले: बोलीये मोदीसाबssss…(मोबाईलवर ‘गडकरी बोलतोय’ असा आवाज सर्वांना ऐकू येतो आणि आठवले सहित सर्व हसतात) कशी आहे तब्येत, रामभौ? (मोबाईल साउंडवर ठेवल्याने सर्वांना ‘याची देही, यांच्या डोळा’ ते दृश्य पाहावयास मिळते) बरी, बरी आहे…

गडकरी: मी देवेंद्रजींना सांगितले आहे.लोकसभा निवडणूक जवळ आली आहे… असे प्रकार घडणे बरोबर नाही… काळजी घ्या, बरं मी फोन ठेवतो.

आठवले: किती काळजी घेतात होss…

पत्रकार: पण, साहेब तुम्हाला कोणाचा संशय आला का? त्यावर ‘प्रकाश’ पडला का?

आठवले: हे पाहा तुम्ही विनाकारण प्रकाश आंबेडकरांना मध्ये आणू नका… त्यांचा काय संबंध?

पत्रकार: आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलत नाही तर ज्याच्यावर तुमचा संशय आहे त्यावर प्रकाश पडला का, असं म्हणतोय आम्ही…

आठवले: असं का? माझ्या हे लक्षातच आलं नाही. (तेव्हढ्यात पवार साहेबांचा फोन येतो) नमस्कार पवार साहेब (आठवले खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न करतात… पणत्यांच्या कार्यकर्त्याने उभे राहू नका म्हणून सांगितले.)

पवार: कशी आहे तब्येत?

आठवले: आता तुमचा फोन आल्यानंतर बरं वाटायला लागले आहे. मोदींसाहेबांचा फोन अजून काही आला नाही, वाईट वाटतं…

पवार: मी आहेना तुमच्या पाठीशी! लोकसभा जवळ आली आहे. राज, नारायण राणे माझ्यासोबत आहेत… बघा विचार करा… बरं तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर बारामतीत निदर्शने झालीत. अजित एकदम टेन्शनमध्ये आहे… शांततेचं आवाहन करा कार्यकर्त्यांना, पत्रक काढा…

आठवले: करतो, करतो… पत्रक काढतो. (पत्रकाराकडे बघत बोलतात) बघितलं.. माझ्या सैनिकांनी बारामतीच्या तोंडचं पाणी पळविलं… शेवटी पवारांना मला फोन करायला लागला. (भीसैनिकांनी बारामती बंद पडली आणि अजित पवारांची पंचाईत झाली ही पत्रकारांना बातमी मिळाली आणि त्यांनी खुश होऊन आठवलेंचा निरोप घेतला. पत्रकार जाताच रामदास आठवलेंनी कानाभोवती गुंडाळलेला मफलर काढला आणि शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याकडे ते बघत राहिले…)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content