HomeArchiveआजपासून पुन्हा सुरू...

आजपासून पुन्हा सुरू होणार अंधेरीची केंब्रिज शाळा!

Details
आजपासून पुन्हा सुरू होणार अंधेरीची केंब्रिज शाळा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महिनाभरापासून बंद असलेली मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध मुंबई केंब्रिज इंटरनॅशनल शाळा शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार. अंधेरी पूर्व येथे असलेल्या या शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालकांच्या प्रचंड गर्दीत आणि शाळेच्या व्यवस्थापकांच्या उपस्थित मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली. महापालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांशी संवाद साधून आमदार लोढा यांनी तत्काळ शाळेचे पाणी आणि विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्याची कारवाई केली. भाजप अध्यक्ष लोढा यांच्यासह यावेळी शाळेच्या परिसरात स्थानिक आमदार पराग अळवणी, भाजपचे महामंत्री अमरजीत मिश्र, नगरसेवक सुनील यादव तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधेरी येथील जे. बी. नगर येथे असलेली केंब्रिज इंटरनॅशनल शाळा गेल्या महिन्याभरापासून बंद असून, महिन्याभरापासून त्रस्त असलेले विद्यार्थी व पालकांनी येथे गुरूवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. ही शाळा पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शाळेचा विद्युतप्रवाह खंडित करून पाणीपुरवठादेखील थांबवला होता. यामुळे निराश असलेले शाळेचे व्यवस्थापक आणि महानगरपालिका यांच्यातर्फे दाखवण्यात येणारा असहयोग पाहता शाळा पुन्हा सुरू होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार लोढा यांच्याशी संपर्क करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आमदार लोढा यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन भविष्यात विद्यार्थ्यांना होणारे नुकसान त्वरित थांबवण्याकरिता शाळेचे विद्युत व पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी दबाव निर्माण केला. त्यामुळे आजपासून ही शाळा पुन्हा सुरू होत आहे.

शुक्रवारपासून शाळा पुन्हा सुरू होण्याच्या बातमीने शाळा व्यवस्थापक संतुष्ट असून, हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिन्याभरापासून बंद असलेल्या मुंबई केंब्रिज इंटरनॅशनल शाळा शुक्रवारी पुन्हा सुरू होणार असल्याने त्रस्त विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content