HomeArchiveअहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे...

अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

Details
अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अहल ए अदब या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा व शायरी संध्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाने श्रोते व रसिक मंत्रमुग्ध झाले.

अहल ए अदब या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम भरगच्च गर्दीत झाला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना झाल्यानंतर गजल गायक आजम असादत खान यांनी रूचि दरोलियाची गजल ‘जब से गिरे हैं इश्क में उडने लगे हैं देखिए’ गाऊन श्रोत्यांना कार्यक्रमाच्या अंतरंगात नेले. ग़ज़ल गायक सचिन शर्मा यांनी हस्तीमल हस्तीजींची प्रसिद्ध ग़ज़ल, ‘प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है’ सादर केली. गझल गायकीनंतर मुशायराला प्रारंभ झाला. त्यात डॉ वसिफ, जनाब स्वप्नील, जुबैर अली तबिश यांनी सादर केलेल्या गझलांना श्रोत्यांमध्ये विशेषतः युवा वर्गाने विशेष दाद दिली. लुधियानाचे शायर मुकेश आलम यांनी शेर, ‘इतने सारे राबतों में इक सहारा ढूंढना, तसेच जैसे एक तारा ढूंढना’ यांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

डॉ. राजेश मोहन यांनी तरन्नुममध्ये गझल सादर केली. ‘खयाल ए यार में उलझे हुए हैं, नए अशआर में उलझे हुए हैं’ यांना श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाला. वरिष्ठ शायर जनाब शारिक कैफी काही अपरिचित शायरी सादर केल्या. त्याला सर्व स्तरातील श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. जनाब शमीम अब्बास साहब यांनी शेर,’ तुममे कुछ भी वाहियात नहीं, जाओ तुम आदमी की जात नहीं’ याच्याबरोबरच गझल सादर केली. संस्थापक रोहित दरोलिया यांनी श्रोत्यांच्या मागणीवरून आणखी एक कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content