HomeArchiveअजातशत्रू डॉ. जगन्नाथराव...

अजातशत्रू डॉ. जगन्नाथराव हेगडे!

Details
अजातशत्रू डॉ. जगन्नाथराव हेगडे!

    07-Jun-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
आज दि. 7 जून. सुप्रसिद्ध समाजसेवक आणि मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांचा वाढदिवस. गेल्यावर्षी डॉ. हेगडे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस थाटामाटात पार पडला. सर्व थरातील लोक डॉ. हेगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. डॉ. हेगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखाताई हेगडे हे येणाऱ्यांचे हसतमुखाने स्वागत करीत होते. डॉ. हेगडे यांना आम्ही पहिली-दुसरीत होतो तेव्हापासून ओळखतो. डॉक्टरांचे पिताश्री आमच्या वडिलांचे मित्र होते. डॉक्टरांनी घोडपदेव नाक्यावर दवाखाना सुरू केला तेव्हा आम्ही डॉक्टरांना प्रथम पाहिले. एक दिवस दाढदुखीने त्रस्त होऊन आम्ही रडू लागलो. तेव्हा आम्ही 6-7 वर्षांचे होतो. आमचे वडील शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे आम्हाला डॉ. हेगडे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांचे ते राजबिंडे व्यक्तिमत्त्व पाहून आमचे बालमन प्रभावित झाले. त्यानंतर डॉक्टरांनी अत्यंत प्रेमाने आमची विचारपूस करीत आमच्या दातावर उपचार केले. काही मिनिटांत वेदना संपल्या. तेव्हापासून डॉ. जगन्नाथराव हेगडे हे आमच्यासाठी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व बनले.

सामाजिक कार्यातील डॉक्टरांचा उत्साह अवर्णनीय आहे. दरवर्षी ते गणेश दर्शन स्पर्धा घेतात. लालबाग परळ भागातील गणेशोत्सव मंडळांना त्यांचे परिक्षक मंडळ भेट देते. मग सर्वोत्कृष्ट मंडळे निवडून त्यांना समारंभपूर्वक पारितोषिके दिली जातात. त्यामुळे परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे चीज होते. डॉक्टरांचे वैशिष्ट्य असे की, मुंबईत ते कोठेही गेले तरी त्यांना ओळखणारे लोक भेटतात. ते प्रेमाने आणि आदराने डॉक्टरांचे स्वागत करतात. मुंबईचे नगरपाल असताना डॉ. हेगडे यांनी या पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला. सतत दोन टर्म ते नगरपाल होते. त्यावेळी नगरपालांच्या कार्यालयात सर्वसामान्य लोकांची मोठी वर्दळ असे. एरवी वर्षानुवर्षे ओस पडलेले हे नगरपालांचे कार्यालय डॉ. हेगडे यांच्या उपस्थितीमुळे चैतन्यमय बनले होते.
1985 साली डॉ. हेगडे यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना परळ मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट दिले.

त्यावेळी डॉ. हेगडे यांच्या प्रचारासाठी अभिनेते शशी कपूर आले होते. डॉ. हेगडे यांचे रूबाबदार व्यक्तिमत्त्व पाहून तेदेखील भारावून गेले. आपल्या भाषणात ते म्हणाले, `डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्याकडे पाहून मला असे वाटले की फिल्मस्टार मी नसून ते आहेत’. डॉ. हेगडे यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला शशी कपूर यांनी दिलेली ती दाद होती. तथापी डॉ. हेगडे हे केवळ दिसायलाच चांगले नाहीत तर मनानेदेखील ते खूप खूप चांगले आहेत. लहान मुलाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहेत. स्वभावाने हळवे आहेत. काही दिवसांपूर्वी आमची आणि त्यांची भेट झाली असता आम्ही एका पायाने लंगडत असल्याचे त्यांना जाणवले. आम्हाला आर्थरायटीजचा त्रास सुरू झाल्याचे आम्ही त्यांना सांगितले. ते आमच्याकडे पाहतच राहिले. आमच्या चेहऱ्यावर त्यांना वेदना स्पष्ट दिसत होत्या. आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघू लागताच त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी आम्हाला काळजी घेण्यास सांगितले. दुसऱ्याचे दु:ख पाहून स्वत: दु:खी होणारा माणूस विरळाच. डॉ. हेगडे अशा दुर्मिळ लोकांपैकी आहेत.

डॉ. हेगडे यांना टापटिप राहणे आणि योगासने करून नियंत्रित आहार घेणे आवडते. त्यामुळे अमृत महोत्सवी वाढदिवस होऊन गेला तरी आजही ते तरूण दिसतात. गेल्या वर्षी मुंबई मराठी पत्रकार संघात भारताचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनिअर व कर्णधार दिलीप वेंगसरकर आले होते. त्यावेळी आम्ही डॉ. हेगडेंनादेखील सन्मानाने निमिंत्रित केले होते. डॉक्टरांना पाहून वेंगसरकर खुश झाले. ते म्हणाले, `डॉक्टरांचे आणि आमचे जुने संबंध आहेत’. इतक्यात कोणीतरी फारूख इंजिनिअर यांना त्यांचे वय विचारले. पोटाचा घेर सुटलेले इंजिनिअर म्हणाले. `माझे वय ऐंशी वर्षे आहे.’ त्यावर डॉ. हेगडे त्यांना म्हणाले, `मी पंचाहत्तर वर्षांचा आहे’. हे ऐकून इंजिनिअर त्यांच्याकडे पाहातच राहिले. त्यांनी डॉक्टरांकडून त्यांचे व्हिजिटींग कार्ड मागून घेतले. तर असे आहेत अजातशत्रू डॉ. जगन्नाथराव हेगडे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देत असताना ते शतायुषी होवोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत.”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content