HomeArchiveअंधेरीच्या राजाचे १८...

अंधेरीच्या राजाचे १८ तासांनी झाले विसर्जन!

Details
अंधेरीच्या राजाचे १८ तासांनी झाले विसर्जन!

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता, सुमारे १८ तासांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गणेशभक्तांच्या साक्षीने वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.
 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग साधून अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
 
मंगळवारी, दि. १७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये आरूढ झालेल्या अंधेरीच्या राजाची सुमारे १५ हजारांहून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत भव्य विसर्जन मिरवणूक निघाली. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी बुधवारी दुपारी दोन वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.
 
या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळून मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडला. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूरांनी केली होती. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधवांनी दिवाळीतला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.
 
 ”

केएचएल न्यूज ब्युरो

“मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता, सुमारे १८ तासांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गणेशभक्तांच्या साक्षीने वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.”
 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग साधून अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
 
“मंगळवारी, दि. १७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये आरूढ झालेल्या अंधेरीच्या राजाची सुमारे १५ हजारांहून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत भव्य विसर्जन मिरवणूक निघाली. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी बुधवारी दुपारी दोन वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.”
 
या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळून मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडला. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूरांनी केली होती. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधवांनी दिवाळीतला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content