Friday, March 14, 2025
Homeमाय व्हॉईसतुमच्या माईकमध्ये व्हायरस...

तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसला असेल…

विधानसभेतील ध्वनिव्यवस्थेवरून विधानसभेत बुधवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये वाग्युद्ध रंगले. परस्परांना टोमणे मारताना आता ध्वनिव्यवस्थेमधील (माईक) बिघाडाचीही एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशी लावावी, अशी मागणीही केली गेली.

चौवीस तासांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी चौकशी जाहीर केल्याचा या वाग्युद्धाला संदर्भ होता. कॉँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माईकमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याचे निदर्शनाला आणले. त्यामुळे तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताहात, असा आरोप पटोले यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पटोले यांना उद्देशून आता नाना, तुमच्या अध्यक्षतेखालीच चौकशी लावतो, असे सांगून हंशा मिळवला.

माईक

त्यात सध्या सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले आणि आपल्या मासलेवाईक टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाना तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसला असेल. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

नाना पटोले यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर देत सांगितले की, राज्यात विरोधी पक्षांमध्ये जे काही होत आहे, ते सगळे व्हायरस तुमच्याकडून म्हणजे सत्ताधारी बाकांकडूनच सोडले जात आहेत. त्यालाही सर्व सदस्यांनी दाद दिली.

मात्र, ध्वनिव्यवस्थेमधील गोंधळामुळे सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप अनेक सदस्यांनी आपापल्या आसनांवर बसून आणि अध्यक्षांच्या परवानगीविनाच केल्याने ते सभागृहाच्या कामकाजाचा भाग झालेले नाहीत. पण, अखेर अध्यक्षांवर ध्वनिव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्याची वेळ आली. अनेकदा सभागृहात सदस्य राजकीय फायद्यासाठी हेतूपुरस्सर गोंधळ घालतात आणि त्यात सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील सदस्यही मागे नसतात. पण, दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या सहकार्यानंतरही केवळ तांत्रिक कारणासाठी कामकाज तहकूब करण्याची वेळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर बुधवारी आली.

Continue reading

दारूतून मिळणाऱ्या पैशातून २५ लाख देणार का?

राज्याला दारूतून दरवर्षी ३० हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आणि रस्ते अपघातातले ७० टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होत असतात. मग रस्ते अपघातात प्राण गमावणाऱ्या व्यक्तींना आणि जखमींना दारुपासून मिळणाऱ्या महसुलातून प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई देणार...

अजितदादांनी पुन्हा एकदा दिली फटकळ, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची प्रचिती

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या फटकळ आणि मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याची झलक त्यांनी सुमारे सत्तर मिनिटांच्या आपल्या भाषणातही दाखवली. इतकेच नव्हे तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या वेळीही त्यांनी...

.. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला सुरेश भटांच्या ओळींचा आधार

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे..., या कवितेचा आधार घेतला आणि विरोधकांसह संपूर्ण सभागृह...
Skip to content