Wednesday, November 6, 2024
Homeडेली पल्सतंबाखूच्या जादा उत्पादनावरील...

तंबाखूच्या जादा उत्पादनावरील दंड होणार माफ?

तंबाखू मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादित केलेल्या अतिरिक्त तंबाखूवरील दंड माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले.

शनिवारी गोयल यांनी हैदराबादमधील शमशाबाद येथील नोवोटेल येथे तंबाखू उत्पादक शेतकरी, उत्पादन निर्यातदारांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी संबोधित करताना गोयल यांनी, फ्ल्यू क्युअर्ड व्हर्जिनिया तंबाखूसाठी शेतकऱ्यांना विक्रमी उच्च किंमत मिळाल्याबद्दल तसेच आर्थिक वर्ष 2023-24मध्ये भारतीय तंबाखूच्या विक्रमी निर्यातीबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी उपस्थित तंबाखू उत्पादकांनी तंबाखू उत्पादनात भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. मजुरांचा तुटवडा, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी मदतीचा अभाव, सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) खताची जास्त किंमत, अतिरिक्त तंबाखू उत्पादनासाठी दंड, तंबाखूच्या कोठारांसाठी वाढीव इंधन खर्च यासारख्या समस्यांची समस्यांची त्यांनी माहिती दिली आणि सरकारकडून आवश्यक तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्याची मागणी केली.

तंबाखू निर्यातदारांना निर्यात प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही योजनेत समाविष्ट केले जात नाही. तंबाखू व्यापाऱ्यांनी तंबाखू निर्यातदारांना निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफी योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान करत असलेल्या भारतातील तंबाखूचे अनधिकृत उत्पादनावर नियंत्रणा आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पियुष गोयल यांनी तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेतली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योग यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसह बिनव्याजी कर्जाची व्यवस्था करण्याचा सल्लाही त्यांनी तंबाखू मंडळाला दिला. तंबाखू मंडळाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात वाढीव आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी सुचवले.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content