Homeमाय व्हॉईसआदित्य ठाकरे शिवडीतून...

आदित्य ठाकरे शिवडीतून विधानसभा लढणार?

मणिपूर कसं शांत करायचं यासाठी आमचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. पण तुमच्या मालकाच्या वरळी विधानसभेत काय काय जळतंय याचा विचार करा. मणिपूरपेक्षा जास्त आग वरळी विधानसभेत लागलीय.. पेंग्विनच्या वाढदिवसाचे बॅनर 13 जूनला वरळीत फाडले. त्याची माहिती दडवली गेली. ती बाहेर येऊ दे. निष्ठावंत शिवसैनिक सुनील शिंदेंचे खच्चीकरण तुमच्या मालकाचा नवीन नाईट लाईफ पार्टनर सचिन अहिर करत आहेत, हे तुमच्या कानावर आलं पाहिजे. जुन्या प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांना वरळीत जो त्रास दिला जातोय त्याचे परिणाम 2024ला दिसत असल्याने तुमच्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे 2024ची विधानसभा शिवडी विधानसभेतून लढणार आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आज खरी शिवसेना मोकळा श्वास घेऊन वर्धापनदिन साजरा करतेय. ओसाड गावचे पाटील उद्धव ठाकरे यांनी काल शिल्लक सेनेचा मेळावा घेतला. निवडणूक आयोगाने यांना उद्धव बाळासाहेब गट अशी नोंद करत जे मशाल चिन्ह दिलंय ते पण अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंत होतं. ज्यांना स्वतःचा पक्ष नाही, चिन्ह नाही,  ते ओसाड गावचे पाटील उद्धव ठाकरे काल वरळीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर मोठमोठ्या बाता करत होते. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुले टाकून आले. आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत.. या मुद्द्यावर युती तोडायची.., असा सवाल त्यांनी केला.

आदित्य

कालच्या वरळीतील सभेत ठाकरे गटाचे किती शिवसैनिक होते? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक समाजाचे लोक पैशाने आणून सभा भरलेली होती. उद्धव ठाकरेंनी पाटण्याला विरोधी पक्षांच्या सभेसाठी जाणार आहेत. पाटण्याच्या सभेत ठणकावून सांगा- हिंदुंना दिलेला त्रास सहन करणार नाही.. तर समजू तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.

संजय राजाराम राऊत म्हणतात, भाजपाला मोजत नाही. त्यांना महाविकास आघाडीचे नेते किती मोजतात हे आपण असंख्य वेळा पाहिलंय. प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी या दुतोंडी संजय राऊतची राजकीय किंमत किती आहे हे वारंवार सांगितलंय.. उद्या गद्दार दिन साजरा करायचा सल्ला देणाऱ्या राऊत यांनी 28 नोव्हेंबर हा राजकीय धर्मांतर दिवस साजरा करावा. सल्ले दयायचेच तर त्या मुंब्र्याच्या आमदारांना द्या जिथे 400 हिंदूंचे धर्मांतर झाले.., असेही ते म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content