Homeटॉप स्टोरीरोजच्या रोज का...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी ‘सेफ हेव्हन’ म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत.

डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव

या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे आणि ट्रेझरी बाँड्सकडे गुंतवणूक वळत आहे, ज्याचा थेट दबाव सोन्यावर पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $ 4,989 प्रति औंसच्या जवळ आहे. थोडक्यात, युद्धामुळे निर्माण झालेल्या महागाईच्या भीतीने सोन्याला मदत करण्याऐवजी नुकसानच केले आहे, कारण त्यामुळे कपात होण्याची शक्यता असलेले व्याजदर आता कमी होणार नाही आणि डॉलर सशक्त राहिल.

भारतातील लग्नसराई ट्रिगर; पण खरेदी परवडत नाही

भारतात लग्नसराईपूर्वी मागणी थोडी मंदावली आहे, कारण उंचावलेल्या भावांमुळे ग्राहकांची खरेदी थांबली आहे. मात्र, लग्नाचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांच्या मागणीला काही प्रमाणात आधार मिळत आहे, तर ETF आणि डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक स्थिर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर सोन्याचा गोठ घ्यायचा आहे, पण ₹ 1.57-1.63 लाख प्रति 10 ग्रॅम भावाने खरेदी करायला कुणीही धजावत नाही. अनेक किरकोळ खरेदीदार परवडणाऱ्या किंमतींसाठी प्रतीक्षेत असल्याने मागणी घटली आहे. गुंतवणूकदार सध्या डिजिटल आणि ETF माध्यमातून सोन्यात खरेदी करत आहेत.

सोन्या

पुढे काय? – तज्ञांचे अंदाज आशावादी

जेपी मॉर्गनच्या विश्लेषकांनी सांगितले की, सोने वर्षअखेरीस $ 6,300 प्रति औंसपर्यंत, म्हणजे सध्याच्या भावापेक्षा 30% अधिक जाऊ शकते. “गोल्ड हे एक बहुआयामी पोर्टफोलिओ हेज आहे आणि गुंतवणूकदारांची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त आहे”, असे त्यांनी नमूद केले. डि-डॉलरायझेशन, केंद्रीय बँकांची वाढती खरेदी, भूराजकीय अनिश्चितता आणि डॉलर कमकुवत होण्याची दीर्घकालीन शक्यता, या सर्व घटकांमुळे सोन्याच्या बुल मार्केटचा मूळ ढाचा अजून शाबूत आहे.

चांदीबद्दल बोलायचे तर, इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील औद्योगिक मागणीमुळे सोन्यापेक्षा अधिक वेगाने परत येण्याची क्षमता चांदीत आहे; मात्र ती सोन्यापेक्षा 1.7 पट अधिक अस्थिर असल्याने धोकाही तितकाच जास्त आहे.

थोडक्यात, सध्याची घसरण ही दीर्घकालीन कलाचा अंत नाही. ती एक तात्पुरती नफावसुली आणि डॉलर-मजबुतीची प्रतिक्रिया आहे. जागतिक केंद्रीय बँका, विशेषतः उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील, सोन्याची खरेदी वाढवत राहिल्यास आणि भूराजकीय तणाव आणखी तीव्र झाल्यास सोन्याला दीर्घकालीन मजबूत आधार मिळत राहील. भारतीय ग्राहकांसाठी सल्ला एकच- घसरणीचा प्रत्येक टप्पा हा संधी म्हणून पाहावा, कारण, वर्षअखेरीस सोन्याचे भाव आतापेक्षा खूप वर असण्याची शक्यता तज्ज्ञांना अधिक वाटते.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content