Homeकल्चर +येत्या शुक्रवारी पाहा...

येत्या शुक्रवारी पाहा रहस्यमय ‘रंगीत’

आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनव्हासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर.. एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ येत्या शुक्रवारी, १७ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.

चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम  नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्याशिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रेयसीचा चेहरा  एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रेयसी मरण पावली कशी, याचा शोध  सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पाहयला मिळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकार केल्या आहेत.

मराठी मातीतल्या चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग व्हावेत असं नेहमी वाटतं. अशाच एका प्रयोगातून  जन्मलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजनाच्या शिखरावर पोहोचवेल याची खात्री वाटते. त्यामुळेच आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे  सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content