Homeचिट चॅटएमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास...

एमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास वाडेकर

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून विलास वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत असलेल्या सुभाष चंद गुप्ता यांची जागा घेणार आहेत. सध्या वाडेकर एमआरव्हीसीमध्ये संचालक (तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेच्या (आयआरएसई) 1991च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

वाडेकर यांनी अमरावती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सर्व शाखांमध्ये अव्वल येत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यांनी स्थापत्य-संरचना अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीतील विशेष गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये तीन दशके काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी प्रकल्प नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2019मध्ये वाडेकर यांची केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली. याद्वारे त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्त्वक्षमता अधोरेखित झाली. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रकल्पांमध्ये त्यांचा 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाचे प्रकल्प:

ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका.

उधना-जळगाव दुहेरीकरण आणि विद्युतीकरण.

एमयूटीपी-III: विरार-डहाणू चौपदरीकरण व बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका प्रकल्पांसाठी नियोजन, आरेखन व मान्यता मिळवणे, तसेच वनविभागाची मंजुरी मिळवणे.

अनधिकृत प्रवेश नियंत्रण कार्य.

तुर्भे-नेरुळ ट्रान्स हार्बर लाईन.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content