Homeकल्चर +उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' मराठी...

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ मराठी ओटीटीवर!

महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबरपासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमेश कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रोटरडॅम, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक-आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.

कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच (डॉ. मोहन आगाशे) फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, नंदू माधव, रेणुका दफ्तरदार, मंगेश सातपुते, अमृता सुभाष, सतीश तारे, चंद्रकांत गोखले, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी आहेत. प्रख्यात छायाचित्रकार सुधीर पलसाने यांनी ‘वळू’चा ७० एमएम कॅनव्हास चित्रित केला असून कलादिग्दर्शन रणजित देसाई यांचे तर अत्यंत आकर्षक पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.

मराठी चित्रपटांचा चेहरा बदलणारा आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना एक वेगळा उत्साह असून ओटीटीवर चित्रपटास नक्कीच भरभरून प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content