हजरत अल्हाज ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हसनी यांचा उरूस उद्या, म्हणजेच २० जानेवारीपासून २४ जानेवारी २०२३पर्यंत मुंबईतील अँटॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया या पवित्र वास्तूत होत असून त्यानिमित्ताने २० जानेवारी रोजी भव्य मुशायरा मिस्त्रा – ए – तराह आणि राष्ट्रीय सूफी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
“दौर है यह आपका, सारी खुदाई है आपकी’’.., ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय स्तरावरील सूफी शायर या संमेलनात आपली गुरुविषयीची भक्ती वेगवेगळ्या पंक्तींतून सादर करून हा मुशायरा साजरा करणार आहेत. उर्दूसह हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये गुरूची स्तुती विविध कवनांमधून करण्यात येईल. विशेषतः अमजेर, दिल्ली, लखनौ, बेसंडी शरीफ (रामपूर), पाटणा, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातून अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी आदी ठिकाणाहून व इतर प्रांतातून हा शिष्य परिवार या ठिकाणी एकत्र येणार आहे.
सज्जाद नसीन सूफी फैजुल हसन शाह हे या संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत. त्याचे व्यवस्थापन मेहफिल-ए-जहांगिरियाचे सरचिटणीस हुसेन काझी व त्यांचे सहकारी करतील तर त्यांच्या मदतीला नव्या पिढीतील खानकाह मजिदिया खुद्दाम कमिटीच्या माध्यमातून युवा वर्ग भाविकाचे व्यवस्थापन करणार आहे.
प्रेषित महंमद पैगंबर यांच्या शिष्यपरंपरेतील ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हे ४५वे धर्मगुरू असून विद्यमान कालखंडातील ज्येष्ठ सूफी धर्मगुरू असल्यामुळे त्यांची कुत्बे जमाना अशी ओळख आहे. सिराजूल अवलिया हजरत अल्हाज ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हसनी कादरी चिस्ती अबुल उलाई जहांगिरी रेहमतुल्ला अलय अशी उपाधी असणारे या धर्मगुरूंनी अँटॉप हिलसह हिंदुस्थानातील अनेक प्रांतात कठोर तपश्चर्या करून ईश्वरी आज्ञेने संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी तसेच एकात्मतेसाठी व्यतित केले.
अधिक माहितीसाठी संपर्क– ८६५२५२६७५२, ८१०८६३०३७२.

