Thursday, December 12, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजनिवडणुकीतल्या काळ्या पैशावरच्या...

निवडणुकीतल्या काळ्या पैशावरच्या नियंत्रणासाठी टोल फ्री नंबर जारी

निवडणूक काळात, काळ्या पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला सहाय्य करण्यासाठी दिल्लीच्या प्राप्तिकर संचालनालयाने (तपास) खोली क्र. 17, तळमजला, सी-ब्लॉक, नागरी केंद्र, नवी दिल्ली-110002 टोल फ्री नंबरः 18001123300 येथे विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तक्रारीकरीता लँडलाईन नंबरः 011-232312/31/67/76 टोल फ्री मोबाईल क्रमांकही 9868168682 जारी केला आहे.

लोकसभेच्या 2024च्या सर्वसाधारण निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे व्हाव्यात, यासाठी योगदान देण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्राप्तिकर संचालनालय (तपास) दिल्लीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याद्वारे, बेहिशेबी रोख रक्कम, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू, ज्यांचा वापर मतदानासाठी होऊ शकेल, अशा संशयित वस्तू आणि हालचाली यांच्यावर, आचारसंहितेच्या काळात नजर ठेवली जात आहे.

प्राप्तिकर

इतर उपाययोजनांबरोबरच, संचालनालयाने नवी दिल्लीतल्या नागरी केंद्रामध्ये 24X7 म्हणजेच पूर्णवेळ  नियंत्रण कक्ष उघडला आहे आणि एक टोल-फ्री क्रमांकदेखील जारी केला आहे, जिथे कोणतीही व्यक्ती संवाद साधू शकते. तसेच, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात रोख, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या संशयास्पद हालचाली/वितरणासंदर्भात प्राप्तिकर विभागाला कोणतीही माहिती देऊ शकते. या नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्यांना नाव किंवा ओळखीचे इतर तपशील यासारखे कोणतेही वैयक्तिक तपशील उघड करण्याची गरज नाही. मिळालेली माहिती विश्वासार्ह आणि कारवाई करण्यायोग्य असणे महत्त्वाचे असेल.

नियंत्रण कक्ष दिल्लीतील आदर्श आचारसंहितेच्या संपूर्ण कालावधीत म्हणजेच 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेच्या तारखेपासून ते दिल्लीतील निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कार्यरत राहील. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी नागरिकांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या संदर्भात संबंधित माहिती संचालनालयाला देऊन त्यांची मदत करावी, अशी विनंती संचालनालयाने केली आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त  ठेवली जाईल, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content