Homeएनसर्कलही आहेत कारणे...

ही आहेत कारणे सोन्याच्या दरांतल्या घसरणीची!

१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी, यासारख्या इतर घटकांमुळे पिवळ्या धातूचे दर मागील आठवड्यात घसरले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

पिवळ्या धातूतील गुंतवणूकदारांचा रस वाढला

अमेरिका आणि इतर देशांमध्ये वाढत्या कोरोना महामारी पुन्हा डोके वर काढण्याच्या चिंतेमुळे शेअर बाजाराला धक्के बसत आहेत. संसर्गजन्य डेल्टा व्हेरिएंट आणखी पकड बसवण्याची चिन्हे आहेत. यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी ३० जुलै रोजी संपलेल्या एफओएमसी बैठकीत म्हटले की, फेडकडून समर्थन मागे घेण्यापूर्वी अमेरिकी जॉब मार्केटला अजूनही संरक्षणासाठी थोडा आधार आहे. तसेच अनिश्चित जागतिक वृद्धीचा अंदाज आणि वाढती महागाई असतानाही सहज चलन धोरण चालूच ठेवण्याची वचनबद्धता मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा दर्शवल्यामुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीत वाढ झाली.

अमेरिकेतील नोकऱ्यांचे चित्र अधिक चांगले

अमेरिकेतील रोजगाराच्या अंदाजानुसार ६ ऑगस्ट २०२१ रोजी अमेरिकन कामगार विभागाने जारी केलेल्या गैर कृषी पेरोल आकडेवारीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. यात अमेरिकन नियोक्त्यांनी एका वर्षात सर्वाधिक कामगार नियुक्त केले आणि वेतनही वाढवले.

गेल्या महिन्यात गैर कृषी पेरोलमध्ये ९,४३००० नोकऱ्या वाढल्या. ऑगस्ट २०२०नंतरचा हा सर्वात मोठा नफा ठरला. मे आणि जूनमधील आकडेवारीतही सुधारणा आहे. ११९,००० नोकऱ्या यादरम्यान निर्माण झाल्या. बेरोजगारीचा दर १६ महिन्यांत ५.४ टक्क्यांनी घसरला. फेडच्या अधिकाऱ्यांनी अधोरेखित केलेल्या नोंदींद्वारे, कामगार बाजारात सुधारणेच्या पार्श्वभूमीवर महामारीचे युग परतण्याची शक्यता लवकरच असल्याचे दिसते.

सोन्या

मागील काही आठवड्यांत मनी मॅनेजर्सचे सोन्याकडे दुर्लक्ष

३ ऑगस्ट २०२१ पर्यंत, म्हणजेच गेल्या काही आठवड्यात नेट लाँग्सचे १,०६,६६२ करार एकत्रित झाले, २० जुलै २०२१ रोजी ते १,०८,८१५ एवढे होते. पिवळ्या धातूतील फंड मॅनेजर्सचे आकर्षण ओसरत चालल्याचे हे संकेत या घसरणीतून मिळतात. त्यामुळे पुढील आठवड्यात पिवळ्या धातूत आणखी मंदी येऊ शकते.

सोन्याचे पुढे काय होणार?

सोन्याच्या बाजारावर अनेक विरोधाभासी घटकांचा परिणाम होतो. एका बाजूला डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे तर कामगार बाजारातील सुधारणा अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकते, यामुळे सोन्याच्या बाजारात दीर्घकाळासाठी असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये द्विधा मन:स्थिती दिसू शकते.

परिस्थिती काहीही असो, प्रत्येक वळणावर सोने जमा करावे लागते आणि सोन्याच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या सुधारणेमुळे ज्यांनी आधीची सुधारणेची संधी गमावली आहे, त्या गुंतवणूकदारांना अनुकूल संधी मिळाली आहे. महिन्याच्या दृष्टीकोनातून, ४७,५०० रुपयांच्या अपसाइड टार्गेटकरिता, ४५,५००-४६,००० रुपयांच्या झोनमध्ये सोने जमा करण्याची आमची शिफारस आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content