Monday, November 4, 2024
Homeचिट चॅटअमिताभसोबत काम करताना...

अमिताभसोबत काम करताना कधी भीती वाटली नाही!

मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या “वार्तालाप” कार्यक्रमात नुकतेच काढले.

भायखळा येथील चाळीतील बालनाटकांतून सुरू झालेला प्रवास, गुन्हेगारी जगतावर आधारित एकशून्यशून्य मराठी मालिका ते आज अनेक चित्रपट, टीव्ही मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षांच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी यावेळी उलगडला. लवचिक काठीच्या तलवारीला नारळाच्या करवंटीची मूठ तयार करून शूर शिवाजी पात्राचा अभिनय ते  सीआयडीपर्यंत बंदुकीची गोळी व त्याचा शोध या सर्व पार्श्वभूमीवर बदललेले तंत्रज्ञान त्यांनी सांगितले.

अभिनेता ते नेता अशी संधी आली तर? या थेट प्रश्नाला उत्तर देताना साटम म्हणाले की, नाही.. आता आहे ते ठिक आहे. नको ते राजकारण. “नेता” मी अभिनय करत चित्रपटात साकारला आहे.. तेवढे पुरे.

मुंबई दूरदर्शनवर प्रथम मला कॅमेरा पाहता आला. एकशून्यशून्य या गुन्हे मालिकेने जो अनुभव दिला तो सीआयडीसाठी मोलाचा ठरला. अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत हसतखेळत सर्वांनी राहिले पाहिजे तरच जीवनाचा आनंद घेता येतो. दिग्दर्शक हा चित्रकार असतो. कलाकार त्यातील एक रंग असतो. त्याला आनंद झाला की मला आनंद होतो, असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, शिवाजी साटम यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक जगभर होत असते. एकदा ट्रॅफिक पोलिसांनी माझी कार अडवली. यावेळी माझ्या मोटारीत पोलिसांनी शिवाजी साटम यांना पाहिले आणि त्यांना सलाम ठोकला.

कार्यवाह संदीप चव्हाण यांनी शिवाजी साटम यांच्या सीआयडी मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरून कौतुक केले. त्यांच्या या मालिकेमुळे कोणी गुन्हेगारीकडे वळले असे झाले नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content