Thursday, November 7, 2024
Homeकल्चर +"संगीत मानापमान"चा टिझर...

“संगीत मानापमान”चा टिझर झळकला!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोरंजनाचा डबल धमाका होत असून बहुप्रतीक्षित ‘सिंघम अगेन’सोबत जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावेंच्या “संगीत मानापमान” चित्रपटाचा टिझरही झळकला आहे.

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्यदिव्य चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा हा संगीतमय सिनेमा असणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानीची एक छोटीशी झलक आपल्याला टिझरमध्ये बघायला मिळेल.

अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे हा टिझर प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड मल्टी स्टारर चित्रपटासोबत म्हणजेच “सिंघम अगेन”सोबत १ नोव्हेंबरला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पाहयला मिळणार आहे. रोहित शेट्टी आणि सिंघमचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे सिनेमाघरांमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी हा एन्टरटेन्मेंटचा डबल डोस नक्कीच म्हणता येईल.

“संगीत मानापमान” या चित्रपटाच्या टिझरची सुरुवातच मधुर संगीताने होते. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. केवळ संगीत नव्हे तर पारंपरिक नृत्य, तलवारबाजी आणि मोठाले सेट, विलोभनीय दृष्य अशा बऱ्याच गोष्टी टिझरमध्ये आहेत, जे हे खात्री पटवून देतात की नक्कीच हा चित्रपट नवीन वर्ष गाजवणार आहे.

या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १६ दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. इतकंच नव्हे तर त्यातले ७ गायक नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे. अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामीसोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि आणखी प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. त्यामुळे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त करताना सांगितले की, ” मला आनंद होतोय की आज रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिंघम अगेन”सारख्या चित्रपटासोबत मराठी परंपरेचा साज राखणारा आणि सुरेल संगीताचा मान ठेवणारा “संगीत मानापमान” चित्रपटाचा टिझर मोठ्या पद्यावर झळकणार आहे. केवळ मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे इतर तमाम प्रेक्षक आणि विशेषतः सिनेमा लव्हर्स जे सिनेमागृहात जातील त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या पडद्यावर हा टिझर बघणं एक वेगळाच अनुभव असेल. ह्या तमाम प्रेक्षकांपर्यंत टिझर पोहोचवण्यासाठी मी जिओ स्टुडिओजचे मनःपूर्वक आभार मानतो. हा सिनेमा नक्कीच एक मनोरंजनाची संगीतमय अविस्मरणीय भेट ठरणार आहे. त्यामुळे मी खूप जास्त उत्सुक आहे की संपूर्ण महाराष्ट्र आमच्या ह्या लार्जर दॅन लाईफ सिनेमाचा आस्वाद घेणार आहे आणि मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास खूप उत्सूक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content