Homeकल्चर +श्री स्वामी समर्थ...

श्री स्वामी समर्थ यांचे मूळ चरित्र आता वाचकांसाठी उपलब्ध!

इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे भक्त गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र आता त्यांच्या भक्तांसाठी तसेच वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या सान्निध्यात राहून दैनंदिन घटनांची टाचणे करून त्याआधारे लिहिलेले हे जीवनचरित्र आता त्यांचे पणतू प्रशांत केशव मुळेकर यांनी १२व्या आवृत्तीच्या रुपाने प्रकाशित केले आहे.

हे चरित्र म्हणजे स्वामी भक्तांसाठी ठेवा आहे. ते उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर प्रशांत मुळेकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याचे प्रकाशन केले आहे. स्वामी समर्थ यांच्या मुखातून आलेली अध्यात्म, धर्म, जीवन, भक्ती, शास्त्र, व्यवहार वगैरेसंबंधीची बोधवचने तसेच महाराजांविषयीची माहिती ठिकठिकाणांहून संकलित करून त्यांनी १८९७ साली हे गद्य जीवनचरित्र लिहिले आहे. यात अक्कलकोट स्वामींचे वास्तव्य, अनुभविक माहिती, स्वामीभक्त चोळाप्पा, बाळाप्पा आणि श्रीस्वामी भक्त परायण स्वामीसुत, आनंदनाथ महाराज, तातमहाराज, दादरचे श्री बाळकृष्ण महाराज आदींचीही माहिती आहे. हे पुस्तक सध्या एमॅझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या ऑनलाईन स्टोअरवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेच. शिवाय इच्छुकांना अधिक माहितीसाठी प्रशांत मुळेकर यांच्याशी ९८६७७९९९१५, ७०२१२८६००७ वर संपर्क साधता येईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content