Homeपब्लिक फिगरपहिल्या पॅरा खेलो...

पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आजपासून दिल्लीत!

पहिली खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धा आजपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खेलो इंडिया

सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डासह 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1350पेक्षा जास्त स्पर्धक या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा नेमबाजी, पॅरा तिरंदाजी, पॅरा फुटबॉल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा वेटलिफ्टिंग’सह 7 क्रीडा प्रकारांमध्ये पॅरा ऍथलीट्स चुरशीची लढत देतील. या स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आयजी स्टेडियम, तुघलकाबादमधील शूटिंग रेंज आणि जेएलएन स्टेडियम अशा तीन स्टेडियममध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.

पॅरा खेलो इंडिया गेम्सबद्दल बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन हे एकमेकांच्या भावना समजून घेणाऱ्या सर्वसमावेशक समाजाच्या निर्मिती आणि बळकटीकरणाच्या दिशेने एक पाऊल आहे. नवी दिल्लीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी आठवडाभर चालणाऱ्या ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मुळे भावनांचा कोलाहल आणि भारतीय क्रीडाप्रेमींना आतापर्यंत न दिसलेली गुणवत्ता प्रदर्शित करण्यात मदत होईल.

ते पुढे म्हणाले की, 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1400 पॅरा ऍथलीट दिल्लीत एकत्र जमलेले पाहणे भारावून टाकणारे असेल. सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्डाच्या खेळाडूंची उपस्थिती, या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सना निश्चितच एक अतिरिक्त आयाम देईल.

खेलो इंडिया हे निश्चितपणे आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरले आहे. या उपक्रमाने केवळ क्रीडा प्रकार  लोकांपर्यंत नेले नाही तर देशभरातल्या अनेक अकादमी आणि योजनांसह वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोन अंतर्भूत केला आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

खेलो इंडिया पॅरा गेम्स देखील मुख्य प्रवाहातील जीवनात दिव्यांगांच्या प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांशी सुसंगत आहेत. व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी सवलतीच्या दरात कर्जे पुरवणे यासारख्या उपक्रमांमुळे आर्थिक तसेच सामाजिक सबलीकरणाला चालना मिळाली आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सने या उपक्रमांना बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content