लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने काल 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024मध्ये होणाऱ्या 102 लोकसभा मतदारसंघांसाठी अधिसूचना जारी केल्यानंतर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये 19 एप्रिलला मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बिहार वगळता इतर सर्व 20 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी 27 मार्च असून बिहारसाठी ती 28 मार्च 2024 आहे.
पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्य / केन्द्रशासित प्रदेशांत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेः
