Thursday, December 12, 2024
Homeमुंबई स्पेशलदूध दराबाबत शासनाने...

दूध दराबाबत शासनाने काढलेला आदेश कंपन्यांनी धुडकाविला!

राज्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दूध दराबाबत आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. सरकारने काढलेला दूध दर आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला तसेच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 34 रुपये प्रती लीटर दर देण्यासही नकार दिला.

सरकारच्या आदेशाची अशी अवहेलना होत असताना सरकार आजच्या बैठकीत मंत्री केवळ गुळमुळीत सारवासारव करताना दिसले. सरकारच्या आदेशाची किंमत रद्दीची असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. असे रद्दी शासनादेशाची 24 नोव्हेंबर रोजी दूध संकलन केंद्रांवर राज्यभर शेतकऱ्यांनी होळी करावी व विविध मार्गाने आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केले आहे. राज्यभर शेतकरी कार्यकर्ते उपोषण, रास्तारोको व दुग्ध अभिषेक घालून दूध दराच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. अशा सर्व आंदोलनांना संघर्ष समिती पाठिंबा व्यक्त करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दूध दर परिपत्रकाची केली होळी

राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खाजगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु आजच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने आजची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज सदाभाऊ खोत, डॉ. अजित नवले तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी या शासन परिपत्रकाची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर होळी केली. तसेच येत्या २४ नोव्हेंबरला राज्यभर या शासन परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content