Homeडेली पल्सभारताने 'अस्त्र' क्षेपणास्त्राची...

भारताने ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी!

भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (LCA) LSP-7 तेजसने 23 ऑगस्ट 2023 रोजी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सुमारे 20,000 फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण उदाहरण ठरेल.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञ, यांच्यासह सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) आणि हवाई गुणवत्ता हमी महासंचालक (DG-AQA) यांनी या चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण केले. या विमानाचे परीक्षण, देखरेख करणाऱ्या दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानानेही केले. 

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र, ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून  नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे.  स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानावरून प्रक्षेपण, हे ‘आत्मनिर्भर भारत’ लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाउल आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एलसीए वरून क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, ADA, DRDO, CEMILAC, DG-AQA आणि उद्योग यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की या प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. संरक्षण विभागाचे (R&D) सचिव आणि DRDO च्या अध्यक्षांनीही या यशस्वी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या चमूंचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content