Homeएनसर्कलव्यसनाधीनांकडून होणारा छळ,...

व्यसनाधीनांकडून होणारा छळ, वयोवृद्धांच्या काळजीसाठी ‘तापस’!

व्यसनाधीनांकडून होणारा छळ कसा रोखावा, वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, तृतीयपंथीयांचे प्रश्न कसे सोडवावे अशा विविध सामाजिक संरक्षणविषयक बाबींचे विनामूल्य शिक्षण उपलब्ध करणारे तापस (Training for Augmenting Productivity and Services), या उत्पादकता आणि सेवा ऑनलाईन पोर्टलचा आरंभ काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेन्द्र कुमार यांनी केला.

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (NISD) आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहयोगाने विकसित झालेल्या या पोर्टलचे उद्‌घाटन रामदास आठवले आणि प्रतिमा भौमिक या राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात झाला. कोविड काळात ज्ञानार्जन आणि काम यांच्या यांच्यासाठी ऑनलाईन माध्यम अत्यावश्यक झाल्यामुळे तापस, या कल्पनेला बळ मिळाले.

तापस, हे पोर्टल राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहयोगाने तयार झाले आहे. विषय तज्ज्ञांची भाषणे, अभ्यास साहित्य आणि संबंधित इतर बाबी या पोर्टलवर आहेत. प्रत्यक्ष वर्गाला पुरवणी साहित्य म्हणून वापरता येण्याच्या दृष्टीने पोर्टल तयार करताना‌‌ अध्यापनाशी कुठेही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन त्यांचे ज्ञान आणि क्षमतावर्धनाच्या दृष्टीने कौशल्य विकसित करणे, हा अशाप्रकारे प्रशिक्षण स्वाध्याय पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे.

ज्या कोणाला एखाद्या विषयातील आपले ज्ञान वाढवण्याची इच्छा असेल त्यांना याचा वापर करता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. व्यसनाधीनांकडून होणारा छळ, जेरीएट्रिक म्हणजे वयोवृद्धांची काळजी घेणे, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथी व्यक्तींचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षण बाबींसंबंधी सर्वंकष अभ्यास हे यातील पाच मूलभूत अभ्यासक्रम आहेत.

याबाबतीत पुढाकार घेतल्याबद्दल वीरेंद्र कुमार यांनी NISDच्या चमूचे अभिनंदन केले. सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या वर्गापर्यंत अध्यापन पोहोचवण्यासाठी हे ऑनलाईन माध्यम प्रभावीपणे काम करेल असेही त्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम असल्यामुळे कोणालाही याचा वापर व्यवस्थित करण्याची मुभा आहे असेही त्यांनी नमूद केले.

तापस, हे सर्वसाधारण MOOC (Massive Open Online Course) म्हणजे बहुसंख्यांना वापरता येणारे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा मंच आहे. त्यामध्ये ध्वनिचीत्रित केलेले लेक्चर्स आणि ई-अभ्यासक्रम आहे, असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणार्थी आणि अभ्यासक्रमातील सहभागी व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधण्याला प्रोत्साहन मिळावे, मदत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरीता चर्चांसाठीचे फोरमही यात समाविष्ट आहेत.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content