Wednesday, February 5, 2025
HomeTagsGold

Tag: Gold

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड...

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्रामला ग्रामीण...

रायशाचे सोनेरी यश

नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या...

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्रामला सुवर्णपदक

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्रामला ग्रामीण झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील उपजीविका पुनर्संचयन, उत्पन्नवाढ व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी केलेल्या परिवर्तनशील प्रयत्नांबद्दल सन्मान मिळाला आहे. हा कार्यक्रम वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टसोबतच्या भागीदारीत राबविण्यात आला. अॅक्सिस बँक फाउंडेशनला (ABF) फिक्कीच्या (FICCI) चौथ्या सस्टेनेबल एग्रीकल्चर समिट आणि अवार्ड्स 2024 सोहळ्यामध्ये मानाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान-तपशीलक्षम शेती या श्रेणीमध्ये, हवामान-तपशीलक्षम स्मार्ट शेती व नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट पद्धती आणि नवकल्पनांसाठी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत ABFने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR)ला पाठिंबा दिला, ज्याने झारखंडमधील खुटी जिल्हा, तेलंगणातील  नारायपेठ जिल्हा, तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला जलसंधारण कामात सहभागी होण्यासाठी सक्षम केले. या प्रयत्नांमुळे पाण्याची उपलब्धता वाढली, कमी धोकादायक शाश्वत शेतीपद्धती स्वीकारून पिकांचे उत्पादन वाढले आणि स्थानिक समुदाय संस्थांना विकासाच्या पुढील दिशेने नेण्यासाठी सक्षम केले. या प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे झाला हा परिणाम: ●        सिंचन सुविधेत वाढ: तेलंगणा आणि झारखंडमधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधांमध्ये सुधारणा. ●        उत्पन्नात वाढ: सुधारित सिंचन आणि शेतीपद्धतींमुळे वार्षिक उत्पन्नात वाढ. ●        शेतीची विविधता: फळझाडे, कृषी-वनीकरण झाडे लागवड, किचन गार्डनिंग आणि मल्टिलेयर शेती यांसारख्या पद्धतींचा अवलंब. ●        संस्थात्मक बळकटीकरण: स्थानिक संस्था जसे की, ग्रामविकास समित्या (VDCs), शेतकरी गट (FIGs), शेतकरी उत्पादक संघ (FPOs) आणि महिला बचत गट (SHGs) यांची स्थापना करून, मनरेगा (MGNREGS) अंतर्गत संसाधनांचा उपयोग करून पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. ●        हवामान-तपशीलक्षम पद्धतींचा अवलंब: 8,920 हून अधिक शेतकऱ्यांनी हवामान-तपशीलक्षम पद्धती स्वीकारल्या, ज्यामुळे उत्पादकता आणि मातीची गुणवत्ता सुधारली तसेच खर्च व अजैविक खतांचा वापर कमी झाला. ●        शेती-बाह्य उपजीविका विकास: घरांसाठी पशुपालन शेडचे बांधकाम व दुरुस्ती, पशुधन खरेदी आणि डुकरांचे संगोपन, यासाठी शासनाच्या विविध योजनांशी संलग्नता ठेवून विपणन साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. भारताचे विस्तृत भौगोलिक स्वरूप, विविध कृषी-हवामान क्षेत्रे आणि नैसर्गिक संसाधनांची समृद्धी ग्रामीण समुदायांच्या टिकावासाठी, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी (NRM) व ग्रामीण उपजीविकांसाठी मोठी आव्हाने निर्माण करतात. तेलंगणा, झारखंड आणि महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांना जलसंपत्तीची तीव्र कमतरता व नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास या गंभीर समस्यांचा  सामना करावा लागतो. या समस्या शेती व संलग्न उपजीविकांवर थेट परिणाम करतात. विशेषतः आदिवासी गट आणि भूमिहीन कुटुंबे, जी या भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकसंख्येचा  मोठा भाग आहेत, हवामान बदलाच्या दुष्परिणामांसाठी सर्वाधिक संवेदनशील आहेत. हवामान बदलामुळे उत्पादनाचे मोठे नुकसान, शेतीसाठी लागणाऱ्या सामुग्रीचे वाढलेले खर्च आणि  घटलेले उत्पन्न, यामुळे या समुदायांची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या समस्या सोडविण्यासाठी, कार्यक्रमाद्वारे उद्दिष्ट भागांमध्ये लक्ष्यित हस्तक्षेप केले जात असून, जलसंपत्ती  व्यवस्थापन, शाश्वत शेतीपद्धतींचा अवलंब आणि ग्रामीण समुदायांच्या उपजीविकांसाठी शाश्वत उपाययोजना राबविल्या जात आहेत. हे प्रयत्न ग्रामीण भागात आर्थिक आणि पर्यावरणीय स्थैर्य  निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या एक्जीक्यूटिव ट्रस्टी आणि चीफ एक्जीक्यूटिव ऑफिसर ध्रुवी शाह या पुरस्कारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाल्या की, आमचा सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्राम स्थानिक संदर्भानुसार उपजीविकेच्या आव्हानांना सखोलपणे समजून हाताळतो. FICCIच्या चौथ्या सस्टेनेबल एग्रीकल्चर समिट आणि अवार्ड्स 2024मध्ये मिळालेला सन्मान हा आमच्या प्रयत्नांचे यश आणि प्रोत्साहन आहे. हा पुरस्कार ग्रामीण समुदायांमध्ये स्वावलंबनाच्या महत्त्वावर आमच्या बांधिलकीला दृढ करतो. हा सन्मान आमच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा  निर्धार पक्का करतो आणि आम्हाला सकारात्मक बदलाची एक स्थिर व शाश्वत वारसा निर्माण करण्याची प्रेरणा देतो, जो आगामी वर्षांमध्येही टिकून राहील.

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या...

अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्रामला ग्रामीण झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील उपजीविका पुनर्संचयन, उत्पन्नवाढ व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी केलेल्या परिवर्तनशील प्रयत्नांबद्दल सन्मान मिळाला आहे. हा कार्यक्रम वॉटरशेड ऑर्गनायझेशन...

रायशाचे सोनेरी यश

नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा सावंतने मुलींच्या गटात शानदार कामगिरी करताना लांब उडीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. सध्या...

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय...

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला...

‘ओमेगा’ची पॅरिस २०२४...

कोणत्याही क्रीडा प्रकारातील यशाचे मोजमाप म्हणजे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक. पॅरिस २०२४ ऑलिंपिकचा अधिकृत टाइमकीपर, ओमेगाने ऑलिंपिक खेळांमध्ये मिळणाऱ्या या प्रतिष्ठित पदकांच्या सन्मानार्थ...

मुंबईत बनावट हॉलमार्कचे...

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतल्या अंधेरी भागातल्या एका कंपनीवर धाड टाकून हॉलमार्कचे बनावट शिक्के मारलेले जवळजवळ ७१४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत केले....

सोन्यात गुंतवणूक करण्याची...

सध्या भारतीय गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या संकटात ते मदतीला येते. आता तर केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ दोन...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content