Monday, December 23, 2024
Homeकल्चर +'स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना' व...

‘स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना’ व ‘संचित संस्कृतीचे’चे उद्या प्रकाशन

विश्वभरारी फाऊंडडेशनच्या वतीने भरारी प्रकाशनच्या ३००व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन उद्या, बुधवारी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना तर स्मिता भागवत लिखित संचित संस्कृतीचे, या पुस्तकांचे प्रकाशन होईल. हा कार्यक्रम मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ सभागृहात सायंकाळी चार वाजता होईल.

स्थानिक आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, वीरमाता अनुराधा गोरे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाश राणे, चंद्रकात बर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. सायली वेलणकर आणि संपदा पाटगावकर यावेळी अभिवाचन करतील. यावेळी जगणं आमचं.. हा गप्पांचा कार्यक्रम होणार असून यात रेणुका बुवा आणि लता गुठे सहभागी होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे तर आभार चारुशीला काळे व्यक्त करतील. अधिकाधिक साहित्यप्रेमींनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन विश्वभरारी फाऊंडेशन आणि भारत विकास परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना’विषयी थोडेसे..

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर संस्थानची राणी चेन्नम्मा, अवधची बेगम हजरत महल, झाशीची राणी लक्ष्मीबाई या संस्थानिकांच्या सहधर्मचारिणी! विदेशात स्वातंत्र्यासाठी धडाडीने काम करणाऱ्या मादाम कामा, गुप्त आकाशवाणी केंद्र चालवणाऱ्या उषा मेहता, भगतसिंगला फरार होण्यास अमोल मदत करणाऱ्या नि क्रांतिकार्यात निर्भयपणे सहभागी झालेल्या दुर्गादेवी वोहरा यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करणे केवळ अशक्य असल्याने, इतिहासात त्यांची नोंद करावी लागली. पण सामान्य घरातील स्त्रियांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून समाजाने त्यांची ‘नाही चिरा नाही पणती!’ अशी अवस्था केली. लेखिकेने अशा सामान्यातील असामान्य ठरून स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांगनांचा शोध घेण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे.

क्रांतिकार्याच्या अग्निकुंडात आत्मसमर्पण करणारी तरुणी प्रीतिलता वड्डेदार हिने इंग्रजांच्या क्लबवर हल्ला केला आणि सायनाईडची गोळी खाऊन आत्मसमर्पण केले. दलित महिला उदादेवी पाशी यांनी पतीच्या निधनाचा बदला घेण्यास झाडावर चढून ३६ इंग्रजांना गोळ्या घालून ठार मारले. निर्भय मनाच्या झलकारीबाई झाशीच्या सैन्यात होत्या. त्यांचे राणी लक्ष्मीबाई यांच्या चेहऱ्याशी नवलप्रद साम्य होते. यांचा पराक्रम अप्रतिम! अशा अनेकांचे कार्य सोप्या रसाळ भाषेत या पुस्तकात नमूद केले आहे.

स्वातंत्र्य

स्वातंत्र्यप्रेमी शूर स्त्रियांना प्रकाशात आणण्यास लेखिका लता गुठे यांनी शोध आरंभला व ‘खुल जा सिम सिम!’ किंवा ‘तिळा उघड!’ असा इतिहासास आदेश दिला. स्त्रियांच्या कार्यावरील अनुल्लेखाची ‘तिळा’ दूर होताच त्यांच्यासमोर समाजाने अलक्षित ठेवलेले लोभस वास्तव साकार झाले. या पुस्तकात ते सादर करून त्या वाचकांना या आनंदात सहभागी करीत आहेत. ही माहिती त्यांनी पार्श्वभूमीसह सोप्या भाषेत सादर केली आहे हे विशेष!

स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना

लेखिका- लता गुठे

बांगलादेश

Continue reading

अभ्यासपूर्ण आणि खळबळजनक आहे कुतुब मिनारचा इतिहास! 

हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी छायाचित्रांच्या पुराव्यासह कुतुब मिनारचा खरा इतिहास सांगितला आहे. त्यांनीच लिहिलेल्या या पुस्तकामागची भूमिका...

श्री महालक्ष्मीचा महिमा सांगणारी ‘नारायणी’..

नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी.. आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।  योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।  लेखक किशोर दीक्षित आपल्या मनोगतात लिहितात- आज 'नारायणी' हा लघुग्रंथ आपल्या हाती देताना मनास खूप आनंद व समाधान वाटत...

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का?

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देशाच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा...
Skip to content