Homeचिट चॅटपुराणिक स्मृती क्रिकेटः...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले.

सलामी फलंदाज पूनम राऊत (३९ चेंडूत नाबाद ५३ धावा) व सारा सामंत (२६ चेंडूत नाबाद ५१ धावा) यांच्या नाबाद अर्धशतकासह ११२ धावांच्या अभेद्य सलामी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचा १० विकेट राखून दणदणीत पराभव केला आणि उद्घाटनीय लढत जिंकली. सलामी फलंदाज अचल वळंजूच्या ७२ चेंडूत १८ चौकारासह नाबाद १०५ धावांच्या फटकेबाजीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनवर ३० धावांनी विजय मिळविला.

तिसऱ्या सामन्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्री (४८ चेंडूत ५० धावा) व अष्टपैलू अनिशा रौत (३८ चेंडूत ५१ धावा) यांच्या अर्धशतकी फटकेबाजीसह दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांच्या भागीदारीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याविरुध्द मर्यादित २० षटकात ६ बाद १४४ धावांचे आव्हान उभे केले. मध्यमगती गोलंदाज जुही रावतने १५ धावांत ३ बळी घेतले. जुही रावत (५४ चेंडूत ५१ धावा) व गार्गी बांदेकर (२९ चेंडूत ४२ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे माटुंगा जिमखान्याने १८व्या षटकाला १ बाद १२० धावा असा दमदार प्रारंभ केला होता. परंतु अष्टपैलू अनिशा रौत ( १९ धावांत ३ बळी) व महेक मिस्त्री (१८ धावांत २ बळी) यांच्या ऑफब्रेक गोलंदाजीमुळे अखेर माटुंगा जिमखान्याला ६ बाद १३१ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबने १३ धावांनी चुरशीचा विजय मिळविला. अन्य सामन्यात किंजल कुमारीच्या २६ चेंडूत नाबाद ४२ धावांच्या फटकेबाजीमुळे साईनाथ स्पोर्ट्स क्लबने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा ११ धावांनी पराभव केला.

मुंबई क्रिकेट असोसिएशन या मान्यताप्राप्त स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे केले. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संजय नाईक व जनरल सेक्रेटरी अभय हडप उपस्थित होते.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content