Homeएनसर्कल‘व्हॅलेंटाइन डे’साठी स्ट्रॉबेरी...

‘व्हॅलेंटाइन डे’साठी स्ट्रॉबेरी हार्ट गिफ्ट बॉक्स आणि बरेच काही…

द बॉडी शॉप या ब्रिटनमधल्या आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने व्हॅलेंटाइन्स डे गिफ्टिंग श्रेणी सादर केली आहे. ती पर्यावरणाप्रती योगदान देण्याचे प्रबळ आवाहन करण्यासोबत पर्सनल केअरला अधिक प्राधान्‍य देणाऱ्यांसाठी निश्चितच आनंददायी ठरेल. या कलेक्शनमध्ये स्वीटेस्ट स्ट्रॉबेरी हार्ट गिफ्ट बॉक्स, क्लीन अॅण्ड ग्लीम टी ट्री स्किनकेअर गिफ्ट सेट, स्मूथ अॅण्ड सूथ शेव्हिंग किट, रिफ्रेशिंग अॅण्ड अपलिफ्टिंग व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ आणि हायड्रेटिंग अॅण्ड प्रोटेक्टिंग हेम्प गिफ्ट सेट आदी उत्पादनांचा समावेश आहे.

स्वीटेस्ट स्ट्रॉबेरी हार्ट गिफ्ट बॉक्समध्ये स्ट्रॉबेरी लिप बटर, स्ट्रॉबेरी बॉडी बटर आणि स्ट्रॉबेरी हँड क्रीम येते, जे तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत टीएलसी देण्याची हमी देते. पोषण देण्यासोबत गिफ्ट बॉक्स घानामधील स्थानिक समुदायांना, विशेषत: महिलांना मदत करते. यातील बॉडी बटर आणि हँड क्रीम आफ्रिकन राष्ट्राच्या कम्युनिटी फेअर ट्रेड शिया बटरने हस्तनिर्मित करण्यात आले आहे. या गिफ्ट बॉक्सची किंमत १,३९५ रूपये आहे.

द बॉडी शॉपचा क्लीन अॅण्ड ग्लीम टी ट्री स्किनकेअर गिफ्ट सेट त्वचेवरील डाग दूर करेल. तुम्हाला स्वच्छ, तेजस्वी आणि शुद्ध त्वचा देईल. या गिफ्ट सेटमध्ये टी ट्री क्लिअरिंग मॅटिफाईंग टोनर, टी ट्री ऑईल आणि टी ट्री स्किन क्लिअरिंग फेस वॉश आहे. याची किंमत १,४९५ रुपये आहे.

द बॉडी शॉपच्या स्मूथ अॅण्ड सूथ शेव्हिंग किटमध्ये गुळगुळीत व स्वच्छ शेव्हसाठी माका रूट आणि अॅलोव्हेराच्या चांगल्या गुणांनी युक्त उत्पादने आहेत. स्टबल-स्मूथिंग ट्रीट मेक्सिकोच्या कम्युनिटी फेअर ट्रेड ऑरगॅनिक कोरफडीच्या सहाय्याने बनवले जाते. या किटमध्ये माका रूट अॅण्ड अॅलो शेव्हिंग जेल, माका रूट अॅण्ड अॅलो पोस्ट शेव्‍ह जेल समाविष्ट आहेत आणि याची किंमत २८९५ रुपये आहे.

आनंददायी सुगंधांची आवड असलेल्यांसाठी व्हाइट मस्क फ्लोरा ड्युओ परिपूर्ण भेट आहे. ताजेतवाने सुगंध देऊन या ड्युओची उत्पादने तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत उत्साही ठेवतील. या गिफ्ट बॉक्समध्ये व्हाइट मस्क फ्लोरा फ्रँग्रॅन्स मिस्ट, व्हाइट मस्क फ्लोरा शॉवर जेल, कम्युनिटी फेअर ट्रेड कार्ड समाविष्ट आहेत आणि याची किंमत २,५३५ रुपये आहे.

द बॉडी शॉपचे हायड्रेटिंग अॅण्ड प्रोटेक्टिंग हेम्प गिफ्ट सेट परिपूर्ण भेट आहे, जे अधिक केअर व पोषण देईल. गिफ्ट बॅगमध्ये पुनर्वापर करता येण्यासाठी तागापासून डिझाइन केलेल्‍या हेम्प उत्पादनांचा समावेश आहे. या बॉक्समध्ये हेम्प बॉडी बटर, हेम्प हँड प्रोटेक्टर आणि हेम्प शॉवर ऑईल असून याची किंमत ४,९९५ रूपये आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content