Sunday, April 13, 2025
Homeकल्चर +'दिलवाले दुल्हनिया ले...

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे..’चा पुतळा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये!

यशराज फिल्म्सचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे! हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने नुकतंच जाहीर केलं की, लीसेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपट ट्रेलमध्ये आता एक नवीन मूर्ती सामील होणार आहे आणि ती आहे ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे..’ची! ही लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारली जाणारी पहिली भारतीय चित्रपट मूर्ती ठरेल! याचबरोबर या चित्रपटाच्या 30व्या वर्धापनदिनाच्या उत्सवाचीही सुरुवात होईल.

ही कांस्य मूर्ती बॉलिवूडचे दोन सुपरस्टार, शाहरुख खान आणि काजोल यांना या चित्रपटामधील प्रसिद्ध पोजमध्ये दाखवेल. या वर्षीच्या वसंत ऋतूमध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ब्रिटनमधील 50 लाखांहून अधिक दक्षिण आशियाई समुदाय या चित्रपटावर किती प्रेम करतो हे यावरून स्पष्ट होते. हा चित्रपट भारत आणि जागतिक दक्षिण आशियाई समाजासाठी एक पॉप संस्कृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. हा चित्रपट एक अजरामर आणि पुरस्कारप्राप्त रोमँटिक कॉमेडी आहे, ज्याने आदित्य चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता. या चित्रपटात राज आणि सिमरन या दोन एनआरआयंची कथा आहे, जी युरोप आणि भारतात फिरते. जी किंग्स क्रॉस स्टेशन येथून सुरू होते. विशेष बाब म्हणजे, लीसेस्टर स्क्वेअरचा भाग या चित्रपटात दिसतो, जिथे राज आणि सिमरन पहिल्यांदा (अनभिज्ञपणे) भेटतात. या दृश्यात स्क्वेअरमधील दोन प्रमुख सिनेमागृह दिसतात. राज व्ह्यू सिनेमासमोर आहे आणि सिमरन ओडेऑन स्क्वेअरच्या पुढे चालत आहे. हा नवीन पुतळा ओडेऑन सिनेमाबाहेरील पूर्व टेरेसवर बसवला जाईल.

या चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पडला आहे. इतका की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत भेटीदरम्यान या चित्रपटाचा उल्लेख केला होता. युकेमध्ये या चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्व आजही कायम आहे. याच चित्रपटावर आधारित Come Fall In Love – The DDLJ Musical हे नवीन संगीत नाटक 29 मे 2025पासून मॅंचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये सुरू होणार आहे. 140 दशलक्षांहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स असलेले शाहरुख खान आजच्या काळातील सर्वात प्रिय अभिनेता आहेत. शाहरुख खान आणि काजोल आता ‘सीन्स इन द स्क्वेयर’मध्ये आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांसोबत समाविष्ट होणार आहेत. मागील 100 वर्षांतील 10 अन्य आयकॉनिक पात्रांमध्ये हॅरी पॉटर, लॉरेल और हार्डी, बग्स बनी, जीन केली (सिंगिंग इन रेन), मैरी पॉपिंस, मिस्टर बीन, पैडिंग्टन आणि सुपरहीरोज बैटमैन आणि वंडर वीमेन यांचा समावेश आहे.

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विल्यम्स म्हणाले की, शाहरुख खान आणि काजोल या आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतातील दिग्गजांना आमच्या ट्रेलमध्ये समाविष्ट करणे हा एक सन्मान आहे. दिलवाले दुल्हनिया हा एक सर्वाधिक यशस्वी आणि महत्त्वपूर्ण बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. ही प्रतिमा केवळ बॉलिवूडच्या जागतिक लोकप्रियतेचे प्रतीक नाही, तर लंडनच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सवही आहे. आम्हाला खात्री आहे की जगभरातून चाहते लीसेस्टर स्क्वेअरमध्ये या प्रतिमेला भेट देतील.

यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी म्हणाले की, जेव्हा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. ही ‘Scenes in the Square’मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय फिल्म ठरते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हा पुतळा या चित्रपटाच्या 30 वर्षांच्या प्रवासाचा गौरव आहे. युकेमध्ये या चित्रपटाने साधलेला सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित करतो. हा पुतळा भारतीय चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय आकर्षण दर्शवतो आणि सिनेमाच्या माध्यमातून समुदायांमध्ये मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी...

तव्वहूर राणाचा बोलविता धनी कोण? १२ वाजता होणार चौकशी सुरू!

मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार...
Skip to content