Homeबॅक पेज'स्वामी समर्थ श्री'साठी...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या “स्वामी समर्थ श्री” राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील दत्तू बांदेकर चौकात उद्या, रविवारी ९ मार्चला होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकापेक्षा एक अशा १२५पेक्षा अधिक खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेले पाहायला मिळेल.

गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून शरीरसौष्ठवांना ‘स्वामी समर्थ श्री’मध्ये उतरण्याचे आवाहन केल्याचे स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी दिली. सव्वातीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार्‍या या स्पर्धेत विजेत्याला ५५,५५५ रुपयांचे इनाम दिले जाणार असून उपविजेत्याच्या मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून २२,२२२ रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि ८५ किलोवरील अशा एकंदर आठ गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात पहिल्या पाच खेळाडूंना ८, ६, ५, ४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षिसेही दिली जातील.

महिला आणि दिव्यांगाचीही स्पर्धा

राज्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या थराराबरोबर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचाही एक गट या स्पर्धेत खेळविला जाणार आहे. यातही राज्यातील अव्वल महिला शरीरसौष्ठवांचा सहभाग निश्चित असल्याची माहिती राजेंद्र चव्हाण यांनी दिली. एवढेच नव्हे तर दिव्यांगाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वाकडे, म्हात्रेवर क्रीडाप्रेमींचे लक्ष

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने या स्पर्धेची भव्यता वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेत भारत श्री स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारे शशांक वाकडे (मुंबई), विश्वनाथ बकाली (सांगली), रामा मायनाक (सातारा), नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), रोशन नाईक (पालघर) या दिग्गजांसह अर्शद मेवेकरी (सांगली), ओंकार नलावडे (पुणे), पंचाक्षरी लोणार (सोलापूर), संतोष शुक्ला (ठाणे), नीलेश खेडेकरसारखे (मुंबई) तयारीतले खेळाडू आपल्या पीळदार देहयष्टीची किमया दाखविणार आहेत. प्रभादेवीत अनेक वर्षांनतर राज्यस्तरीय ग्लॅमर असलेली मोठी स्पर्धा होतेय, ज्यात महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची खरी पीळदार श्रीमंती मुंबईकरांना पाहायला मिळेल. प्रत्येक गटात गटविजेतेपदासाठी प्रचंड संघर्ष होणार असल्यामुळे स्वामी समर्थ श्री ग्लॅमरस आणि संस्मरणीय होणार हे निश्चित आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेंद्र चव्हाण (९८७००२३२३५), राज यादव (९६१९४७७२५१), राजेंद्र गुप्ता (९८२०७६७४०३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content