Homeडेली पल्सआजपासून एसटी प्रवास...

आजपासून एसटी प्रवास महागणार!

आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या एसटीचा प्रवास महागणार आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ आजपासून अंमलात येत आहे. डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाईभत्त्यात वाढ झाल्यामुळे २६ ऑक्टोबर २०२१ नंतर पहिल्यांदाच एसटीच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारीला झाली. या बैठकीत राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेसना टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरीप्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले.

 अशी आहे भाडेवाढ-

साधी बसः सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

जलद सेवा (साधारण): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) ११ रुपये.

निमआराम: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन-आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.६५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.७५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.२० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १४.९० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.३५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) २८ रुपये.

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १३.८० रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १५ रुपये.

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये. सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी १५.१५ रुपये. प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) १७ रुपये.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content