Saturday, February 8, 2025
Homeपब्लिक फिगरअजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते...

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज ही घोषणा केली.

प्रवक्ते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश प्रवक्ते म्हणून पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, रुपाली ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के-पाटील, सायली दळवी आदींचा यात समावेश आहे.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content