Homeडेली पल्स‘अंगारक’निमित्त श्री सिद्धिविनायक...

‘अंगारक’निमित्त श्री सिद्धिविनायक मंदिराचे वेळापत्रक जाहीर

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उद्याचे म्हणजेच 10 जानेवारीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उद्याचा दिनक्रम थोडक्यात असाः

पहाटे बारा वाजून दहा मिनिटांनी काकड आरती व महापूजाला सुरुवात होईल. दीड वाजेपर्यंत हे विधी सुरू असतील. पहाटे सव्वातीन ते तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत आरती होईल. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपासून साडेबारा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवला जाईल. संध्याकाळी सात वाजता दर्शन रांग सुरू असतानाही धुपारती होईल. संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य आणि आरती केली जाईल.

मध्यरात्री दीड ते पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत तसेच पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी ते दुपारी बारा वाजेपर्यंत, नंतर दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणे भाविकांना शक्य होईल.

यादिवशी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती मंदिर न्यासातर्फे भाविकांसाठी पुढीलप्रमाणे सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.

  • श्री सिद्धिविनायक वेबसाईटद्वारे श्रींच्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
  • पुरुष भाविकांकरीता रचना संसद (शाह आणि सांगी) येथून प्रवेश दिला जाईल. महिला भाविकांकरीता सिल्वर अपार्टमेंट येथून प्रवेश देण्यात येईल. दुरून श्रीदर्शनाची व्यवस्था आगार बाजार येथून एस के बोले मार्ग व श्री सिद्धिविनायक सोसायटीच्या प्रवेशद्वारातून करण्यात आली आहे. रांगेकरीता मंडप व रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे.
  • मंदिरातर्फे रुग्णवाहिका पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था म्हणजेच मोबाईल टॉयलेटची सोय करण्यात येणार आहे.
  • भाविकांच्या मार्गदर्शनासाठी मंदिरातर्फे विविध सूचनाफलक, मार्गदर्शिका फलक लावले जातील.
  • भाविकांनी श्रींच्या दर्शनाकरीता येताना कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, लॅपटॉप, मोठी बॅग इत्यादी) आणू नये.
  • रात्री साडेअकरा वाजता मंदिराचे रिद्धी तसेच सिद्धी प्रवेशद्वार बंद करण्यात येईल. त्यानंतर मंदिरात असलेल्या सर्व भाविकांचे दर्शन झाल्यावर शेजारती होऊन मंदिर बंद करण्यात येईल.
  • भाविकांना न्यास समितीमार्फत विनंती करण्यात येत आहे की त्यांनी मंदिरात प्रवेश करताना आपापले भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोन बंद करावे.
  • विकलांग, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना एस के बोले मार्ग येथील पदापथावर उभारण्यात येणाऱ्या मंडपातून प्रवेश देण्यात येणार आहे, असे न्यासाकडून सांगण्यात आले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content