Homeकल्चर +उद्या दिवसभर बघा...

उद्या दिवसभर बघा कैलाश सत्यार्थी यांच्यावरील चित्रपट!

जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त फिल्म्स प्रभाग, उद्या दिनांक 12 जून 2021 रोजी  नोबेल पारितोषिक विजेते आणि बालमजुरीविरुध्दच्या लढ्यात मोठे योगदान देणारे कैलाश सत्यार्थी यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारा माहितीपट प्रसारित करणार आहे. हा चित्रपट फिल्म प्रभागाच्या संकेतस्थळावरून तसेच यू-ट्यूब वाहिनीवरून प्रदर्शित होईल.

“आताच कृती करा: बालमजुरी थांबवा” ही यावर्षीच्या जागतिक बालमजुरीविरोधी दिनाची संकल्पना आहे. बालमजुरीची पद्धत संपूर्णपणे थांबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृतीवर ती केंद्रीभूत आहे. चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरू ठेवत, फिल्म प्रभागाने बाल गुलामगिरी आणि लहान मुलांचे शोषण थांबविण्यासाठी जागतिक पातळीवरील चळवळीत आघाडीवर असणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्या या क्षेत्रातील योगदानाला अधोरेखित करणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.

सत्यार्थी यांनी त्यांच्या कार्यातून बालकांच्या शिक्षण घेण्याच्या जागतिक हक्काबाबतदेखील प्रचार केला आहे.  बालकांच्या गुलामगिरीविरुध्द लढा उभारण्याच्या कार्याबद्दलच्या 2014 सालच्या नोबेल पारितोषिकाचे ते सह-विजेते आहेत.

सत्यार्थी, या 2019 साली निर्मित 53 मिनिटांच्या चित्रपटातून प्रसिध्द माहितीपट निर्माते पंकज जोहर यांनी बालजुरी आणि बालतस्करी करणाऱ्या गुन्हेगारांकडून हल्ला होणे तसेच इतर अनेक मोठ्या अडचणींना तोंड देऊन सत्यार्थी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोडवून आणलेल्या लहान मुलांच्या कहाण्या आणि त्यांचे बदलते आयुष्य यांना सजीव केले आहे.

हा चित्रपट https://filmsdivision.org/  या संकेतस्थळावर “या आठवड्याचा विशेष माहितीपट” म्हणून प्रदर्शित होईल तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळावर 12 जून 2021ला संपूर्ण दिवसभर पाहता येईल.

Continue reading

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...
Skip to content