Homeकल्चर +जाणून घ्या के....

जाणून घ्या के. ए. अब्बास, या दिग्गजाला!

प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, कादंबरीकार, नाटककार, लघुकथा लेखक आणि पत्रकार ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए. अब्बास यांच्या 107व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर फिल्म्स डिव्हिजनने‌ तयार केलेला ‘आय हॅव समथिंग टू से.. के ए‌ अब्बास’ हा  माहितीपट आज म्हणजेच 7 जून 2021 रोजी ऑनलाईन प्रसारीत केला जाणार आहे. हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येईल.

धरती के लाल, सात हिंदुस्तानी, परदेसी, शहर और सपना आणि दो बूंद पानी यासारख्या पुरस्कारविजेत्या सामाजिक-वास्तववादी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि जागते रहो, आवारा, नीचा नगर, श्री 420, मेरा नाम जोकर आणि इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांचे पटकथा लेखन असलेले अब्बास यांचे चित्रपट सामान्य माणसाच्या हिताचे आणि चिंतांच्या मुळाशी जाणारे असत.

के. ए. अब्बास यांना उर्दू, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील साहित्यासाठीही (ज्यात इन्क्लाब, या उत्तम कादंबरीचा समावेश आहे) त्यांचे स्मरण केले जाते. मुकेश शर्मा दिग्दर्शित हा फिल्म्स डिव्हिजनचा माहितीपट आर्किव्हल फिल्मिक मटेरियलच्या सर्जनशील वापराद्वारे या दिग्गजाचे जीवन आणि कालावधी दर्शविण्याचा प्रयत्न करतो.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content