Homeडेली पल्समुंबई विमानतळाची सुरक्षा...

मुंबई विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर! 

मुंबईतल्या जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली असून ती बांधण्यासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. ही घटना रविवारी संध्याकाळी 6.40 वाजता घडली. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

ही भिंत कोसळल्यानंतर तेथे फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे. प्रशासनाचे काम अत्यत धिम्या गतीने चालू आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तानसमोरची ही भिंत असून तिला रनवे लागूनच आहे. याठिकाणी मुंबई महापालिकेचे काम सुरू असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ प्रशासनाने ज्या तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विमानतळाची सुरक्षा आणि त्याचे महत्त्व लक्षात घेता भिंत जलद गतीने बांधणे आवश्यक आहे. तेथे फक्त पत्र्याने काय साध्य होईल, असा सवाल गलगली यांनी केला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content