Homeचिट चॅटछपाई ते लेखणी...

छपाई ते लेखणी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

वाचकांशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्या वातावरणाशी अनुकूल असे लिखाण साहित्यिकांनी केले पाहिजे. मालिकांमध्ये हा प्रयत्न होत असल्यामुळे ग्रामीण आणि मुंबई-पुण्याबाहेर त्यांना अधिक प्रेक्षक असल्याचे दिसून येते. असाच प्रयत्न लेखकांनीदेखील अधिक प्रमाणात केला पाहिजे, असे मत लेखक यशवंत मराठे यांनी छपाई ते लेखणी या त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनप्रसंगी व्यक्त केले.

ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांच्या हस्ते या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी विश्वस्त सुदेश हिंगलासपूर, धनश्री धारप आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर विश्वस्त धनंजय गांगल यांनी लेखकाशी संवाद साधला. त्यावेळी यशवंत मराठे यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

मराठी भाषेचा ऱ्हास थांबवायचा असेल तर बोली भाषा टिकवली पाहिजे. मराठी शाळा वाचवा, हा मुद्दा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठीक आहे. बदलत्या वातावरणात नवी पिढी वृत्तपत्र वाचण्याऐवजी इंटरनेटवर ऑनलाईन बातम्या बघण्यात किंवा सर्च करून जाणून घेण्यात, तसेच पुस्तके वाचण्याऐवजी ती ऐकण्याकडे वळत आहेत. परदेशातील हे वारे भारतातदेखील वाहू लागले आहेत. त्यामुळे आता परिवर्तनाला गृहित धरूनच मार्ग शोधले पाहिजेत, असे मतदेखील त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले.

आपल्या लिखाणाची सुरूवात मित्रमंडळी तसेच परिचितांनी सुचवल्यानंतर एकेका विषयावर आवड म्हणून लिहीत असताना होत गेली. सहज चालता–बोलता होणाऱ्या संभाषणातून नवनवीन विषय सुचत गेले आणि प्रसारमाध्यमातील स्तंभलेखनाप्रमाणे लिखाण होत गेले. यापुढील काळात “कृष्ण” या विषयावरील लिखाणाचा संकल्प यशवंत मराठे यांनी व्यक्त केला. कृष्णाच्या प्रत्येक कृतीमागे एक विचार होता आणि हा विचार आजच्या नव्या पिढीला समजेल आणि रुचेल अशा पद्धतीने मांडण्याचा हा एक प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content