Monday, November 4, 2024
Homeचिट चॅटपरत आली एसबीआय...

परत आली एसबीआय ग्रीन मॅरेथॉन!

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), या देशातल्या सर्वात मोठी बँकेने ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’ हा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक लोक यात सहभागी झाले होते. रविवारी सकाळी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. सेठी आणि उप व्यवस्थापकीय संचालक (एचआर) आणि विनोद कुमार मिश्रा यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली.

स्टेट बँकेच्या मॅरेथॉनची ही चौथी आवृत्ती आहे. कोविड-19च्या महामारीनंतर प्रथमच ही मॅरेथॉन होत आहे. साथीच्या आजारापूर्वी, बँकेने या मॅरेथॉनचे आयोजन मानवी पद्धतींमुळे इकोसिस्टमचा ऱ्हास होत

असलेल्या विसंगतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला होता. मॅरेथॉन उत्साही धावपटूंना पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी एकत्र आणते आणि ‘उत्तम उद्याची निर्मिती करण्यासाठी आजचे निरोगी जीवन’ हा विश्वास जागृत करते. यामध्ये सहभागी शाश्वत पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी धावतात.

ही मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा 3 प्रकारांसाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासह बँकेने प्रत्येक भारतीयासाठी ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’द्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याची वैयक्तिक जबाबदारीही असल्याचे यातून अधोरेखित केले जाते. 

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content