Homeडेली पल्ससयाजी नगरी एक्सप्रेस...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यात्मक उत्कृष्टतेविषयी जागरूकता दाखवताना पश्चिम रेल्वेने 344 किमी अंतराच्या विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची रेल्वे संरक्षण प्रणाली, ‘कवच 4.0’, कार्यान्वित केली आहे. काल, 30 जानेवारीला गाडी क्रमांक 20907 दादर-भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली ट्रेन ठरली आणि भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

कवच तंत्रज्ञान विरार-सूरत-बडोदा विभागाच्या 344 किमी मार्गावर कार्यान्वित करण्यात आले आहे. या मार्गावर, 49 स्थानके, 57 रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स आणि सुमारे 700 किमी ऑप्टिकल फायबर केबलच्या सहाय्याने कवच प्रणाली लागू करण्यात आली आहे. धोक्याच्या सिग्नलवर पुढे जाणे, अतिवेग आणि धडकणे यासारख्या मानवी चुकांमुळे होणारे धोके कमी करण्याकरीता ही कवच प्रणाली उपयोगी ठरते. ‘लेव्हल क्रॉसिंगवर ऑटो-व्हिसलिंग’ म्हणजेच स्वयंचलित शिट्टी वाजवणे आणि केबिनमध्ये सिग्नलच्या स्थितीची जाणीव करून देणे यासारख्या वैशिष्ट्यांद्वारे प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीची सूचना या प्रणालीमुळे मिळते.

पश्चिम रेल्वेने यापूर्वी मागच्या महिन्यात डिसेंबर 2025मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली होती. विरार-बडोदा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे, आजपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण 435 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे. आधीच कार्यान्वित झालेल्या विभागांव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या इतर अनेक विभागांवर 2667 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणालीच्या कामासाठी अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च केला जात आहे. याव्यतिरिक्त 2476 मार्ग किलोमीटरवरील पुढील कामांना मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे त्यांच्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कवर ‘कवच’ प्रणालीचा विस्तार करणार आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content