Wednesday, February 5, 2025
Homeकल्चर +राज्य बालनाट्य स्पर्धेत...

राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘सत्य जे विलुप्त’ पहिले!

२०व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड या संस्थेच्या ‘सत्य जे विलुप्त’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई स्पर्श संस्था, ठाणे या संस्थेच्या ‘ये गं ये गं परी!’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक अनिकेत भोईर (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक वैभव उबाळे (ये गं ये गं परी!).

प्रकाशयोजनाः प्रथम पारितोषिक शंतनु साळवी (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक सिद्धेश नांदलस्कर (पॅडल).

नेपथ्य: प्रथम पारितोषिक सिध्दार्थ ठाकूर (ये गं ये गं परी!), द्वितीय पारितोषिक किरवली ग्रामस्थ (पूर्णब्रम्ह).

रंगभूषाः प्रथम पारितोषिक मयुरी जवंजाळ (फुलवा मधुर बहार), द्वितीय पारितोषिक उदय तांगडी (इंडिया घर).

उत्कृष्ट अभिनयः रौप्यपदक गौरांग शमी (सत्य जे विलुप्त) आणि शरयू गोसावी (ये गं ये गं परी!).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः स्वरा जाधव (सत्य जे विलुप्त), स्वरा सावंत (पॅडल), अदिती धामणस्कर (कणा), गिरीजा राऊत (अजब लोठ्यांची महान गोष्ट), सई जहागीरदार (फुलवा मधुर बहार), अमोघ डाके (काजवे), वरद पाटील (अजब लोठ्यांची महान गोष्ट), गंधार मुळ्ये (पॅडल), काव्य चौधरी (बुढ्ढी के बाल), देवांश खेंगले (इंडिया घर).

साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे दि. ९ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वैदेही चवरे, संग्राम भालकर आणि शेखर वाघ यांनी काम पाहिले. तसेच समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, तिथी घाडी, मुकुंद जोशी यांनी उत्तमप्रकारे जबाबदारी सांभाळली.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content